राहुलचा उज्ज्वल मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 02:17 AM2018-03-21T02:17:15+5:302018-03-21T02:17:15+5:30

राखेतून उंच झेपावणाऱ्या दंतकथेतील फिनिक्स पक्ष्याप्रमाणे काँग्रेस पक्ष त्याची सारी मरगळ झटकून सज्ज झाला असल्याचे दिल्लीत झालेल्या त्याच्या अ.भा. समितीच्या अधिवेशनात साºयांना जाणवले आहे.

Rahul's bright way | राहुलचा उज्ज्वल मार्ग

राहुलचा उज्ज्वल मार्ग

Next

राखेतून उंच झेपावणाऱ्या दंतकथेतील फिनिक्स पक्ष्याप्रमाणे काँग्रेस पक्ष त्याची सारी मरगळ झटकून सज्ज झाला असल्याचे दिल्लीत झालेल्या त्याच्या अ.भा. समितीच्या अधिवेशनात साºयांना जाणवले आहे. राहुल गांधींचे नवे नेतृत्व लगेचच प्रस्थापित झाले असल्याचे, सोनिया गांधींचा प्रभाव तसाच शाबूत असल्याचे आणि डॉ. मनमोहनसिंगापासून मल्लिकार्जुन खरगेंपर्यंतचे सगळे वरिष्ठ नेते कमालीच्या संघटितपणे पुन: उभे राहिले असल्याचे त्यात दिसले. त्याचवेळी ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्यासारखे तरुण वयाचे नेतेही तेवढ्याच बळानिशी २०१९ च्या निवडणुकांसाठी सज्ज झाले आहेत हेही अनुभवास आले. अधिवेशनातील सोनिया गांधींचे भाषण जेवढे हृदयस्पर्शी आणि राहुल गांधींचे जेवढे घणाघाती होते तेवढेच डॉ. मनमोहनसिंग व पी. चिदंबरम् यांची भाषणे कमालीची अभ्यासपूर्ण व मोदी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचणारी होती. देशाचे राजकीय वातावरण बदलत असल्याचा परिणामही या अधिवेशनात साºयांना जाणवण्याजोगा होता. गुजरातमधील काँग्रेसच्या आमदारांची झालेली लक्षणीय वाढ, हिमाचलमधील त्याचे वाढलेले मतदान, मेघालयातील त्याचे प्रथम क्रमांकावर असणे आणि राजस्थान व मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांनी त्याला मिळवून दिलेला विजय या गोष्टी त्यासाठी जशा कारणीभूत झाल्या तसेच गोरखपूर, फुलपूर व अररियामधील मोदींचे पराभवही त्यास कारण ठरले. मोदींच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तडे जाताहेत आणि तेलगू देसम हा पक्ष तिच्यातून बाहेर पडला आहे, चंद्रशेखर रावांनीही त्यांचा विरोध जाहीर केला आहे आणि शिवसेनेने तिची तटस्थता जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त पुरोगामी आघाडी संघटित राहिली आहे आणि धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी सोनिया गांधी व शरद पवार यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे. आता अ‍ॅन्टी इन्कम्बन्सीचे आव्हान मोदींसमोर आहे. त्यांचा पक्ष केंद्रासह देशातील २१ राज्यात सत्तेवर आहे. मात्र त्यांची आर्थिक आघाडीतील पिछेहाट, बँकांची दिवाळखोरी, उत्तर व पश्चिम सीमेवर त्यास अनुभवावी लागणारी माघार आणि सरकारच्या पोतडीत असलेल्या दिखावू योजनांची संपुष्टी या गोष्टीही यास कारणीभूत आहेत. पुन: एकवार राममंदिर, गाय व गोमूत्र या घोषणा त्यास द्याव्या लागणे हे याच माघारीचे लक्षण आहे. बेरोजगार तरुणांचे ठिकठिकाणी निघणारे मोर्चे, शेतकºयांच्या न थांबलेल्या आत्महत्या, औद्योगिक क्षेत्रातील मंदी आणि त्यात वाढलेले अंबानी व अदानींचे वर्चस्व या गोष्टीही साºयांच्या डोळ्यांवर येणाºया आहेत. जनतेला दिलेली खोटी आश्वासनेही (त्यात प्रत्येकाला १५ लक्ष रुपये देण्याचे आश्वासनही) आता तिला आठवू लागली आहेत. अल्पसंख्य भयभीत आणि दलित संतप्त आहेत. मध्यम वर्गही काहीसा संभ्रमीत व सरकारच्या निर्णयाबाबत साशंक बनला आहे. आर्थिक क्षेत्रातील बजबजपुरी, प्रशासनातील भ्रष्टाचार आणि सामान्य माणसांची ससेहोलपट या गोष्टी वाढल्या आहेत. ही स्थिती लागलीच काँग्रेस वा विरोधकांना विजय मिळवून देईल असे आज कुणी म्हणणार नाही. मात्र ही स्थिती भाजपला पराभवाच्या रेषेपर्यंत आणू शकेल हे उघड आहे. गोरखपूर व फुलपूरच्या निकालांनी त्या पक्षाने लोकसभेत मिळविलेले स्वबळावरील बहुमत गमाविले आहे आणि मित्रपक्षांच्या कुंबड्यांचा त्याला आधार गरजेचा झाला आहे. ही स्थिती मित्रपक्षांचे महात्म्य व ते मागणार असलेली किंमत वाढविणारीही आहे. मात्र यात एक गोष्ट आणखीही सांगण्याजोगी. गेली चार वर्षे भाजपच्या सोशल मीडियावरील ट्रोल्सनी राहुल गांधी व एकूणच गांधी परिवाराविषयी अपप्रचाराचा जो किळसवाणा प्रकार दिसण्याचीही चीड लोकमानसात एकत्र होत आहे व स्थिती राहुल गांधींचा उद्याचा मार्ग उज्ज्वल असल्याचे सांगणारी आहे.

Web Title: Rahul's bright way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.