पोलीस दलातील ‘प्रशासन’ संपले

By वसंत भोसले on Fri, November 17, 2017 12:48am

‘कोठडीत मारले, आंबोलीत जाळले!’ या सांगलीतील प्रकरणाने महाराष्ट्रातील प्रशासनाच्या विषयीच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी राज्याच्या पोलीसप्रमुखांना पाठविलेल्या अहवालाची नोंद घ्यायला हवी

‘कोठडीत मारले, आंबोलीत जाळले!’ या सांगलीतील प्रकरणाने महाराष्ट्रातील प्रशासनाच्या विषयीच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी राज्याच्या पोलीसप्रमुखांना पाठविलेल्या अहवालाची नोंद घ्यायला हवी आहे. गेल्या दोन वर्षांत सांगली जिल्ह्यातील अनेक गंभीर गुन्हे, घडामोडी आणि त्यावर पोलिसांनी केलेली कारवाई सर्वच वादग्रस्त आहे. शिवाय या सर्व प्रकरणात वरिष्ठांकडून दिलेल्या आदेशांकडे काहीवेळा दुर्लक्ष करण्यात आले आहे, असे स्पष्ट दिसत आहे. पोलीस दलासारख्या महत्त्वाच्या खात्यामध्ये अशी बेदिलीचे वातावरण असणे धोकादायक आहे. महसूल, पाटबंधारे किंवा सार्वजनिक बांधकाम, शिक्षण आदी खात्यांमधील प्रशासनात या गोष्टी पूर्वी व्हायच्या. वरिष्ठ अधिकाºयांचा वचक संपल्याने हा गोंधळ वाढला. याचे कारण वरिष्ठ अधिकाºयांचे प्रशासनातील अधिकारच राज्य शासनाने स्वत:कडे घेतले. त्यामुळे बदल्यांचा मोठा व्यवहार होऊन बसला. कोणत्या जागेवर, पदावर कोण अधिकारी कसा आला आहे. त्याला कुणाचा वरदहस्त आणि आश्रय आहे याची उघड चर्चा सुरू झाली. असे अधिकारी आपल्या नजीकच्या वरिष्ठ अधिकाºयास जुमानतच नाहीत. पाटबंधारे किंवा सार्वजनिक बांधकाम खात्यातही याची मोठी शिस्त पूर्वी होती. त्यामुळे दर्जेदार काम करणाºया हुशार, चाणाक्ष आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाºयांच्या कामाचे चीज होत असे. आता ही परिस्थिती राहिलेली नाही. त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. त्याची लागण पोलीस दलासही झाली आहे. सांगलीच्या प्रकरणाच्या मूळ समस्येकडे गेले तर तेथील पोलीस दलाचे प्रशासन संपलेले आहे, हेच जाणवते. अधीक्षक दत्तात्रय शिंदे किंवा विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यास कारणीभूत नाहीत. त्यांनी त्या परिस्थितीत काम कसे करायचे, याचा स्वत:पुरता निर्णय घेतला आहे. त्यातून संपूर्ण व्यवस्था होरपळून निघते आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाºयास अमूकतमूक नेत्याने (आमदार-खासदार) आणले आहे. त्यासाठी तोडपाणी झाली आहे. परिणामी त्यांनी कसेही वागले तरी काही होणार नाही, अशी चर्चा सर्वसामान्य माणसांमध्ये होत आहे. ती फारच गंभीर आहे. पोलीस दलातील पैशांच्या व्यवहाराची चर्चा तर आता गुपित राहिलेली नाही. एखाद्या अधिका-याने चूक केली तरी त्यास सांभाळून घेतले जाते, असे दिसताच लोकांमध्ये वाईट चर्चा सुरू होते. अनेक पोलीस अधिकारी आणि राजकारणी यांच्यात उघडउघड पैशाच्या देवाण-घेवाणीविषयी चर्चा होते. वरिष्ठ अधिकाºयांच्या या व्यवहारांची चर्चा त्यांच्या कार्यालयात सर्वात कनिष्ठ कर्मचाºयांपर्यंत तपशीलवार होते. तेव्हा त्या खात्यातील नैतिकता काय राहत असेल? सांगलीतील काही पोलीस, पोलीस निरीक्षक यांच्या पातळीवर चुका झाल्या आहेत, त्या याच वातावरणाचा परिपाक आहे. हे एक उदाहरण झाले. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या अहवालातही याचेच प्रतिबिंब उमटलेले आहे. त्यावरून कुणावर कारवाई होईल किंवा होणार नाही. मात्र, पोलीस दलाची प्रशासकीय शिस्त, व्यवहार, नैतिकता आणि कामातील जबाबदारीचे गांभीर्य संपले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायला हवी.  

संबंधित

गडचिरोली : पोलिसांनी केलेल्या कारवाईत जहाल नक्षली कमांडर साईनाथ आणि सिनुहर यांच्यासह 14 नक्षलवाद्यांचा खात्मा
परभणीत दगडफेक प्रकरणी तीन गुन्हे दाखल
अभोण्यात मोबाइल दुकान फोडले
शेट्टी खून प्रकरणात स्थानिक पोलिसांनी अटक केलेले आरोपीच खरे आरोपी : भाऊसाहेब आंधळकर
मोदी अर्थशास्त्र जाणणारे पंतप्रधान : नेने, सांगलीत सावरकर साहित्य संमेलनास सुरूवात

संपादकीय कडून आणखी

महाभियोग ठरेल पेल्यातील वादळ!
त्यांना हवे आरोग्याचे संरक्षण...
बीसीसीआय आणि आरटीआय: पारदर्शकतेसाठी पुढाकार आवश्यक
कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज-- रविवार विशेष --जागर
स्वराज्याकडून सुराज्याच्या दिशेने नागरी सेवा

आणखी वाचा