इंद्रदेवांच्या नववर्ष शुभेच्छा

By राजा माने on Mon, January 01, 2018 12:34am

आज इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर यमके जाम खूश होता. इंद्रदेवांना त्याने फक्त पटवलेच नव्हते, तर चक्क त्याचे महागुरू नारदांवरही त्याने आज कुरघोडी केली होती. २०१८ चे स्वागत २०१७ च्या शेवटच्या रात्री साग्रसंगीत करण्याचा बेत होता. खरे तर नारदांना नववर्ष शुभेच्छा देण्यासाठी गुढीपाडवा, दिवाळी पाडवा आणि विजयादशमी एवढेच मुहूर्त मान्य होते.

 आज इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर यमके जाम खूश होता. इंद्रदेवांना त्याने फक्त पटवलेच नव्हते, तर चक्क त्याचे महागुरू नारदांवरही त्याने आज कुरघोडी केली होती. २०१८ चे स्वागत २०१७ च्या शेवटच्या रात्री साग्रसंगीत करण्याचा बेत होता. खरे तर नारदांना नववर्ष शुभेच्छा देण्यासाठी गुढीपाडवा, दिवाळी पाडवा आणि विजयादशमी एवढेच मुहूर्त मान्य होते. पण यमके मात्र ‘थर्टी फर्स्ट’ सेलिब्रेशनच्या मूडमध्ये होता. अखेर त्याने शक्कल लढविली आणि इंद्रदेवांना मराठी भूमीतील त्यांच्या लाडक्या वत्सांना नववर्ष शुभेच्छा संदेश देण्याची गळ घातली. इंद्रदेवांनीही त्याच्या इच्छेखातर नारदांना तसे आदेश दिले. यमकेला सोबत घेऊनच शुभेच्छा संदेशही तयार करण्याचे फर्मान सोडले. अखेर वैतागलेले नारद सोबतीला यमकेला घेऊन संदेश तयार करायला बसले. नारद : अरे यमके, आता तूच कुणाला काय संदेश द्यायचे ते सांग बाबा. कुणापासून सुरुवात करतो ? यमके : गुरू, आपण जाणत्या राजापासूनच सुरुवात करूया का? तर लिहा... ‘२०१९ च्या निवडणुकीसाठी भुजबळांसह तुमचे सैन्य सज्ज होवो... नारद : अरे, निवडणुकीची भाषा सोड, सुशीलकुमार शिंदेंनी शरद पवार राष्ट्रपती होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. अन् तू काय निवडणूक सज्जतेच्या शुभेच्छा देतोस? यमके : हो, खरंच ना... सुशीलकुमारांनी हा ज्योतिष धंदा ... नारद : (यमकेचे बोलणे तोडत) ज्योतिष धंद्याचे हक्क केवळ आपल्या नानांकडे म्हणजे खा. काकडेंकडे असताना सुशीलकुमारांनी त्यांच्याशी स्पर्धा का करावी? यमके : ते जाऊ द्या हो... आधी शुभेच्छा संदेश तयार करू. तर मग घ्या...पहिले नाव शरद पवार. नारद : नववर्ष सुप्रिया-अजित व पवार कुटुंबकबिल्यासह राष्ट्रवादीला बरकतीचे जावोे! यमके : पुढचे नाव देवेंद्र फडणवीस नारद : नाथाभाऊ विनोदभाई व चंद्र्रकांत दादांना ‘सायलेंट मोड’वर ठेवण्याची किमया जारी राहो व तुमचे हेलिकॉप्टर तंदुरूस्त राहो. यमके : नारायणराव राणे नारद : २०१८ मध्ये डिसेंबरपूर्वी शपथविधीचा योग येवो आणि आपल्या व चिरंजीव नीलेश - नीतेशच्या जिभेवर सदैव साखर राहो! यमके : उद्धवराव ठाकरे नारद : कमळा मावशीची माया पातळ न होवो. मुंबईकरांचे प्रेम अबाधित राहो! यमके : सदाभाऊ खोत अन् महादेव जानकर नारद : पंकजातार्इंवरची माया वाढत राहो अन् देवेंद्रभाऊंवरील श्रद्धा तशीच राहो. यमके : रावसाहेब दानवे नारद : बडबडीचे बेअरिंग न सुटो अन् साले-फालेसारखे शब्द तुमच्या शब्दकोषातून डिलिट होवो. यमके : अशोक चव्हाण नारद : नवे वर्ष ‘आदर्शमुक्ती’चे जावो... यमके राज, राजू शेट्टी, पतंगराव, सुभाषबापू यांची नावे सांगत असताना चक्क इंद्रदेवांचाच फोन आला. त्यांनी संदेश न पाठविण्याचे आदेश देऊन जनतेला फक्त सेलिब्रेशनची परवानगी दिली.

संबंधित

नाशकात गुढीच्या साड्या घेताय आकार
#HappyNewYear : व्हॉट्सअॅपवर नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा खच, भारतातून तब्बल २ अब्ज संदेशांची देवाणघेवाण
सलग ७२ तास पोलिस आॅनड्युटी बजावून कडक पहारा , सातारा जिल्ह्याची शांतता अबाधित
#SHOCKING : या दोन जुळ्यांच्या जन्मात एका वर्षाचं अंतर
नव्या वर्षाचे स्वागत लोटांगणाने, मंदिरांत अलोट गर्दी

संपादकीय कडून आणखी

जो होगा, वह अच्छा ही होगा...
झडते वाद पाहुया...
आततायी पाऊल
‘देश हीच सर्वसमावेशकता, राज्य म्हणजेच न्याय’
एका थराराची समाप्ती

आणखी वाचा