नवे वर्ष आणि नवनवे संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:45 PM2017-12-28T23:45:46+5:302017-12-28T23:46:32+5:30

नव्या वर्षात नवनवे संकल्प करण्याची पूर्वापार पद्धत आहे. काही बहुचर्चित मंडळींचे नवे संकल्प

New year and new resolutions | नवे वर्ष आणि नवनवे संकल्प

नवे वर्ष आणि नवनवे संकल्प

googlenewsNext

- संदीप प्रधान
(नव्या वर्षात नवनवे संकल्प करण्याची पूर्वापार पद्धत आहे. काही बहुचर्चित मंडळींचे नवे संकल्प)
नरेंद्र मोदी : १ एप्रिल २०१८ रोजी सर्व भारतीयांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करीन.
देवेंद्र फडणवीस : नाथाभाऊ आणि पोट दोघांनाही नियंत्रणात ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करीन.
शरद पवार : २०१९ च्या निवडणुकीकरिता तिसरी आघाडी बांधून स्वत: चौथ्या किंवा पाचव्या आघाडीत जाईन आणि समजा भाजपा किंवा काँग्रेसचे सरकार येत असेल, तर मंत्रिपदाकरिता गुडघ्याला बाशिंग बांधून बसेन.
उद्धव ठाकरे : सत्तेला लाथ मारण्याचे इशारा देण्याचे रेकॉर्ड गिनिज बुकात नोंदवेन. इशारे देऊन देऊन तोंड दुखले तर ‘ठाकरे’ चित्रपटाचे शुटिंग पाहायला जाईन.
राज ठाकरे : फेरीवालाविरोधी आंदोलनाकरिता दररोज भायखळ््याला जाण्याचे रेल्वेचे तिकीट काढीन. मात्र, छबिलदास शाळेच्या गल्लीतील वडा खाऊन घरी येऊन व्यंगचित्र काढीत बसेन.
नितीन गडकरी : पत्रकार परिषदेत अथवा भाषणात तोंडातून एकही संख्या उच्चारणार नाही.
हंसराज अहिर : सर्दी-पडसे झाल्यावर फॅमिली डॉक्टरकडे जाऊन औषध घेईन आणि दिवाळीतील टिकल्या उडवण्याची बंदूक दाखवून डॉक्टरांना घाबरवून टाकीन.
अशोक चव्हाण : ‘आदर्श’ विद्यार्थी, वक्ता, कार्यकर्ता अशा कुठल्याही पुरस्कारांच्या कार्यक्रमालाही प्रमुख पाहुणा म्हणून हजर राहणार नाही.
अजित पवार : ‘वेड्या बहिणीची वेडी माया’ हा कथासंग्रह प्रकाशित करीन.
नारायण राणे : ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या स्वत: स्थापन केलेल्या पक्षातून कंटाळून बाहेर पडणार नाही.
एकनाथ खडसे : ‘घरचा आहेर’ देतदेत स्वत:चे नाव गॅझेटमध्ये ‘नाथाभाऊ आहेर’ असे बदलून घेईन.
लसिक मलिंगा : जगात माझ्यासारखा कुणी फेकू निर्माण होऊ नये, याकरिता तुफान फेकूगिरी करीन आणि कुणी फेकूगिरी करीत असेल तर त्याची बोलती बंद करीन.

Web Title: New year and new resolutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.