आंबा पिकतो रस गळतो...

By संदीप प्रधान | Published: June 15, 2018 12:31 AM2018-06-15T00:31:20+5:302018-06-15T01:22:36+5:30

यंदा श्रावणात मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी होणार असली तरी काही नवी गाणी गाण्याचे ठरवले आहे. गेल्या काही दिवसातील काही रसाळ घडामोडींमुळे समस्त महिला वर्गाला ‘त्या’ गाण्यांचा मोह पडला नसता तरच नवल.

Mango | आंबा पिकतो रस गळतो...

आंबा पिकतो रस गळतो...

googlenewsNext

यंदा श्रावणात मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी होणार असली  तरी काही नवी गाणी गाण्याचे ठरवले आहे. गेल्या काही दिवसातील काही रसाळ घडामोडींमुळे समस्त महिला वर्गाला ‘त्या’ गाण्यांचा मोह पडला नसता तरच नवल. ही नवी गाणी गात महिलांनी फुगड्या, बसफुगड्या, झिम्मा, गाठोडं आदी प्रकार करावेत, असा सूर आहे.
आंबा पिकतो रस गळतो राजाचे काम तोच करतो. 
जिम पोरा जिम कपाळाचा भीम
भीम गेला पळून पोरी आल्या उठून
सरसर आंबा पिकतो, मजवरी जादू टाकीतो
या या आंबा खायाला
आमच्या वेण्या घालाया
एक वेणी मोकळी
आंब्यासाठी केली साखळी
पाड पाड रे पोरा
आंब्यांचा हा डोलारा
कुटुंबकबिल्याचा पेटारा
मंगळागौरीच्या वेळी नेहमीप्रमाणे कुणीतरी नासक्या बाठ्यासारखी न नाचता घुम्यासारखी नाराज होऊन बसल्यावर तिची समजूत काढण्याकरिता नवं गाणं आलं आहे.
नाच गं घुमा, कशी मी नाचू
नाच गं घुमा, कशी मी नाचू
या गावचा, त्या गावचा
आंबेवाला न्हाई आला
गोडी न्हाई मला, कशी मी नाचू?
या गावचा, त्या गावचा
आंबा महोत्सव न्हाई झाला
विनोद, आशिषनं बोलावलं न्हाई मला कशी मी नाचू?
मंगळागौरीच्या या कार्यक्रमात काही आंबटशौकिनांनी जुनं
एक लिंबू झेलूबाई दोन लिंब झेलू या गाण्याऐवजी
एक कैरी झेलूबाई दोन आंबे झेलू
दोन कैऱ्या झेलू बाई तीन आंबे झेलू
तीन कैºया झेलू बाई चार आंबे झेलू
चार कैºया झेलू बाई पाच आंबे झेलू
माळ घाली वाघोबाला
वाघोबाची भगवी घोडी
येता जाता कमळ तोडी
कमळाच्या पाठीमागे लपली मोदी-शहा जोडी
अगं अगं २०१९ ला दाखवं तुझं पाणी...
हे नवं गाणं आणलं आहे. आता आंब्यानं सोशल मीडियावर इतका पिंगा घातल्यावर पिंग्याचं गाणही फर्मास झालं पाहिजे हा आग्रह असणे स्वाभाविक आहे. त्यामुळं पिंग्याचं नवं गाणं बाजारात आल आहे.
पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा
पोरगा गं तुझा, पोरगी गं माझी
पोरगा गं तुझा चकणा
पोरगी गं माझी देखणी
पोरगा गं तुझा, त्याच्या आंब्याच्या गं बागा
पोरगी गं माझी, तिला लागतो गं झिंगा
पोरगा गं तुझा, त्याचा सफेद लेंगा
पोरगी गं माझी, त्याला दावेल ठेंगा
पोरगा गं तुझा, युतीसाठी घोळतोय गोंडा
पोरगी गं माझी, गळ््यात बांधायची नाय हा धोंडा
आता वेगवेगळ््या गाण्यांवर कलम केल्यावर महाआघाडीनं तरी का बरं मागं रहावं. त्यामुळे त्यांनाही फेर धरलायला लावलाच
चला चला गं चला सया
चला गं चला फेर धरु या
महाआघाडीचा खेळ खेळू चला
ईव्हीएम घपला जागवूया चला
लोकशाहीचा आंबा पिकवू चला
 

Web Title: Mango

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.