कोहली-शास्त्री सुपरहिट जोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:23 AM2017-09-08T01:23:28+5:302017-09-08T05:08:04+5:30

आधी तीन सामन्यांची कसोटी मालिका, नंतर पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर अखेरचा व एकमेव टी-२० सामना जिंकत टीम इंडियाने श्रीलंका दौ-याची ९-० अशी विजयी सांगता केली.

 Kohli-Shastri Super Hit couple | कोहली-शास्त्री सुपरहिट जोडी

कोहली-शास्त्री सुपरहिट जोडी

googlenewsNext

आधी तीन सामन्यांची कसोटी मालिका, नंतर पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर अखेरचा व एकमेव टी-२० सामना जिंकत टीम इंडियाने श्रीलंका दौ-याची ९-० अशी विजयी सांगता केली. विशेष म्हणजे या दौºयात एकही सामना न गमावता भारताने बलाढ्य आॅस्टेÑलियाची बरोबरी केली. आॅस्टेÑलियाने याआधी अशीच कामगिरी २००९ साली पाकिस्तानविरुध्द केली होती. श्रीलंका दौºयात भारताचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु, इतक्या निर्विवाद वर्चस्वाची अपेक्षा कोणीच केली नसेल. निदान टी-२० सामन्यात तरी लंका संघ भारताला झुंजवेल अशी अपेक्षा होती. पण येथेही भारताने बाजी मारली.
मुळात लंका दौरा भारतीय संघापेक्षा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी मोठी परीक्षा होती. या दौºयाच्या काही दिवसांआधी अनिल कुंबळे यांनी कोहलीसह संबंध बिघडल्याच्या कारणावरून प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कोहलीच्या पसंतीच्या शास्त्री यांची प्रशिक्षक म्हणून वर्णी लागली, तसेच शास्त्री यांच्या पसंतीच्या स्टाफचीही निवड झाली. यामध्ये भारताचा माजी गोलंदाज झहिर खान सारख्या दिग्गज गोलंदाजाला संघापासून दूर रहावे लागले होते. त्यामुळेच, पसंतीचा प्रशिक्षक मिळाल्याने कोहलीपुढे आणि पसंतीचा स्टाफ मिळाल्याने शास्त्री यांच्यापुढे खरे आव्हान होते. पण या दोघांनी आपआपली जबाबदारी चोखपणे सांभाळताना स्वत:ला सिध्द केले.
मालिकेतील एकही सामना न गमावताना कोहलीने आपले नेतृत्वगुण पुन्हा एकदा सिध्द केलेच, पण शास्त्री यांनीही योग्यप्रकारे संघ व्यवस्थापन करताना प्रशिक्षक म्हणून दौºयावर गेलेल्या प्रत्येक खेळाडूला संधी दिली. आगामी विश्वचषक स्पर्धेपूर्वी मजबूत भारतीय संघ तयार करण्याचे लक्ष्य बाळगलेल्या कोहली-शास्त्री यांनी या दौºयात अनेक प्रयोग केले आणि ते सर्व प्रयोग यशस्वीही ठरले. तरी, आगामी आॅस्टेÑलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौºयात याहून चांगली कामगिरी करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. पण तूर्तास तरी भारतीय संघाची भक्कम वाटचाल सुरू असल्याचे मान्य करावेच लागेल.

Web Title:  Kohli-Shastri Super Hit couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.