आततायी पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 04:20 AM2018-07-17T04:20:44+5:302018-07-17T04:20:57+5:30

मुळापर्यंत जाऊन किंवा विवेकाने एखादा प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यातला सोप्यात सोपा पर्याय निवडून त्यातून नामानिराळे होण्याची जी वृत्ती बळावते आहे

Insinuation | आततायी पाऊल

आततायी पाऊल

Next


मुळापर्यंत जाऊन किंवा विवेकाने एखादा प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यातला सोप्यात सोपा पर्याय निवडून त्यातून नामानिराळे होण्याची जी वृत्ती बळावते आहे, त्याचे ताजे उदाहरण म्हणजे पावसाळी पर्यटनासाठी धबधबे-धरणांवर जाण्यास घातलेली बंदी. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील अशा ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी वाढते. बऱ्यापैकी पाऊस झाला आणि डोंगरदºयांतून, कडेकपाºयांतून जलप्रपात ओसंडू लागले, की तरुणांचे, ट्रेकर्सचे जत्थेच्या जत्थे अशी ठिकाणे शोधत तेथे धडकतात. मनमुराद भिजण्याचा आनंद लुटतात. यातील काही ठिकाणे धोकादायक बनल्याने म्हणजे तेथे पाण्यासोबत दगड-धोंडेही पडू लागल्याने, पाण्याच्या प्रवाहाने कातळ धारदार बनल्याने-पाणी साचणाºया डोहांची खोली वाढल्याने जखमी-प्रसंगी मृत्युमुखी पडणाºया पर्यटकांची संख्या वाढू लागली आणि यातील काही ठिकाणांवर बंदी आली. त्यातही हे धबधबे पूर्ण बंद करण्यात आले नाहीत, तर तेथील काही भाग पर्यटकांसाठी धोकादायक जाहीर करण्यात आला. अर्थात अशी बंदी मोडून तेथे जाणाºयांचे, प्रसंगी दारू पिऊन बुडणाºयांचे प्रमाण वाढू लागल्याने आधी रायगडमध्ये आणि त्यापाठोपाठ ठाणे-पालघरमध्ये अशा ठिकाणांवर जाण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली. पण हा साप समजून भुई थोपटण्याचा प्रकार असल्याची टीका लगेचच सुरू झाली, ती रास्तही आहे. यातील बहुतांश ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ज्या ग्रामपंचायतींच्या परिसरात ही ठिकाणे येतात, त्यातील काहींनी तेथे येणाºया पर्यटकांकडून कररूपाने रकमा गोळा करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांच्यावर सुरक्षेचे उपाय योजण्याची जबाबदारी टाकणे सहज शक्य होते. जे नियम किंवा बंदी मोडतील, दारू पिऊन धिंगाणा घालतील त्यांची तपासणी करणे, त्यांना रोखण्याचेही मार्ग यंत्रणांच्या हाती आहेत. ते न योजता थेट बंदी घालून जबाबदारीतून हात वर करणे कितपत योग्य आहे? मूठभरांच्या धिंगाण्यासाठी जर साºया पर्यटकांना वेठीला धरायचे असेल, तर त्याच न्यायाने नदी-समुद्रात बुडून मृत्यू होतात म्हणून किंवा डोंगरदºयांत पडून मृत्यू होतात म्हणून गडकिल्ल्यांवर जायलाही पुढे अशीच बंदी घालणार का? एखादा घाटरस्ता दरडप्रवण आहे म्हणून या काळात तेथील वाहतूकही बंद करून टाकणार का, याचे उत्तर या यंत्रणांना द्यावे लागेल. सरसकट बंदी हा मार्ग नव्हे. त्याऐवजी या ठिकाणांतील धोकादायक भाग बंद करणे, कुंपण घालणे, नियम मोडणाºयांवर त्याच ठिकाणी कारवाई करणे, रोडरोमियोंना वेसण घालणे हे उपाय योजले तरी पुरेसे आहेत. जनजागृतीचा मार्गही हाती आहे. पण त्याअगोदर ती जागृती यंत्रणांत निर्माण व्हायला हवी; तरच असे आततायी निर्णय घेतले जाणार नाहीत.

Web Title: Insinuation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.