हा ‘महाकवी’ असा दुराग्रही कसा?

By गजानन जानभोर | Published: December 26, 2017 12:28 AM2017-12-26T00:28:26+5:302017-12-26T00:28:30+5:30

‘देवदूत’कार सुधाकर गायधनी हे मराठी वाङ्मयातील ज्येष्ठ कवी. लोकांनी आपल्याला ‘महाकवी’ म्हणावे असा त्यांचा दुराग्रह असतो.

How is such a stubborn 'Mahakavi'? | हा ‘महाकवी’ असा दुराग्रही कसा?

हा ‘महाकवी’ असा दुराग्रही कसा?

Next

‘देवदूत’कार सुधाकर गायधनी हे मराठी वाङ्मयातील ज्येष्ठ कवी. लोकांनी आपल्याला ‘महाकवी’ म्हणावे असा त्यांचा दुराग्रह असतो. म्हटले नाही तर ते संतापतात आणि बरळतातही. प्रतिभावंतांमध्ये असे वैगुण्य असतेच आणि समाजही त्याकडे दुर्लक्ष करीत त्याच्या सर्जनशीलतेवर प्रेम करीत असतो. गायधनींचा चाहता वर्ग सर्वत्र आहे. त्यांच्या कवितेने भाषा आणि प्रदेशाच्या सीमा कधीच्याच ओलांडल्या. पण हा श्रेष्ठ कवी माणूस म्हणून ‘वैश्विक’ होऊ शकला नाही, वणी येथे होणाºया विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गायधनींची निवड झाल्याची वार्ता आली तेव्हा साºयांनाच आनंद झाला. त्यात त्यांचे चाहते जसे होते तसेच त्यांच्या तुसडेपणामुळे दुखावलेली माणसेही होती. मराठी कवितेला नवे भान देणाºया या ज्येष्ठ कवीच्या निवडीचे सर्वांनीच मनापासून स्वागत केले. पण, अचानक दुसºया दिवशी गायधनींचा मूळ स्वभाव उफाळून आला. त्यांचे हे रूप यापूर्वीही दिसले पण यावेळी ते जास्तच करपलेले वाटले.
ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, ज्ञानेश वाकुडकर यांना संमेलनात बोलावू नका अशी थेट टोकाची भूमिका गायधनींनी घेतली. गायधनींच्या दृष्टीने वाघ आणि वाकुडकर हे सवंग आहेत. तशी गायधनींची ही ‘सवंग’ यादी त्यांच्या कवितेसारखीच दीर्घ आहे. त्यांच्यादृष्टीने तेच एकमेव कवी, बाकीचे तुच्छ. वाघ, वाकुडकरांना सवंग ठरविण्याचा अधिकार या गायधनींना दिला कुणी? साहित्य संमेलनाध्यक्ष असे कुणाला विरोध करीत नसतात. एखाद्याचे नाव सुचवू शकतात फार तर संबंधिताबद्दल प्रतिकूल मत व्यक्त करू शकतात. पण, त्यांच्या नावांवर आक्षेप घेत थेट राजीनामा देणे, एकूणच हा प्रकार किळसवाणा आहे. गायधनी हे विदर्भ साहित्य संघाचे कठोर विरोधक आहेत. ते स्वाभाविकही आहे. कारण वि.सा.संघाने नेहमीच कंपूशाहीचे राजकारण केले आहे. शेवाळकर-द्वादशीवारांनंतर या संघाची वाटचाल नीतीपेक्षा कूटनीतीच्याच मार्गाने होत आली आहे. संघाचे हे कुटील वर्तमान कायम असतानाही सुधाकर गायधनींना अध्यक्ष करावे असे मनोहर म्हैसाळकरांना वाटणे, ही गोष्ट त्यांच्या मनाचा मोठेपणा दर्शविणारी जशी आहे तसाच तो त्यांच्या प्रायश्चित्ताचाही भाग आहे. म्हैसाळकर आता थकलेले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी अशी माणसे कमालीची हळवी होतात. आयुष्यात अनवधानाने झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त शोधण्याचाही ते प्रयत्न करतात. कदाचित याच भावनेतून म्हैसाळकरांनी गायधनींची अध्यक्षपदी निवड केली असावी!
गायधनी स्वत: काही वर्षांपूर्वी हृदयरोगाच्या मोठ्या शस्त्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. ‘मी मृत्यूचे दार ठोठावून परत आलो आहे’ असे सांगताना हेच गायधनी अनेकदा भावनिक होतात. अशी पुनर्जन्म मिळालेली माणसे उत्तर आयुष्यात क्षमाशील होतात. त्यांच्या स्वभावात बदल झालेला जाणवतो. तो देखणा आणि प्रसन्न असतो. थोडक्यात काय तर नियतीने त्यांना पूर्वायुष्यातील चुकांचे प्रायश्चित्त घेण्याची संधी एकाच जन्मात दिलेली असते. म्हैसाळकरांनी ती स्वीकारली मात्र गायधनींनी कद्रुपणाने गमावली. यशवंतराव चव्हाण गायधनींच्या कवितेचे भक्त होते. त्यांच्या विजनवासात गायधनींच्याच ‘चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो...’ या कवितेने त्यांना साथ दिली. माणसाच्या आयुष्याचे सार चार शब्दांत सांगणारा हा श्रेष्ठ कवी मात्र आपल्याच शब्दकळांना असा कृतघ्न व्हावा? त्यांच्या प्राक्तनाचा हा शोकात्म भाग क्लेषदायक आहे.
ँ्नंल्लंल्ल.्नंल्लुँङ्म१@’ङ्म‘ें३.ूङ्मे

Web Title: How is such a stubborn 'Mahakavi'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.