‘स्त्री शक्ती’चा सन्मान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 04:00 AM2018-04-04T04:00:41+5:302018-04-04T04:00:41+5:30

मुंबईतील आठ पोलीस ठाण्यांत ‘वरिष्ठ पोलीस निरीक्षक’ म्हणून पोलीस विभागाने महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. महिला अधिका-यांच्या नियुक्तीचे स्वागतच करायला हवे़ खरेतर, सर्वच क्षेत्रांत महिलांची आगेकूच सुरू आहे. 

Honor of 'women power'! | ‘स्त्री शक्ती’चा सन्मान!

‘स्त्री शक्ती’चा सन्मान!

Next

मुंबईतील आठ पोलीस ठाण्यांत ‘वरिष्ठ पोलीस निरीक्षक’ म्हणून पोलीस विभागाने महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. महिला अधिका-यांच्या नियुक्तीचे स्वागतच करायला हवे़ खरेतर, सर्वच क्षेत्रांत महिलांची आगेकूच सुरू आहे. महिला पोलीस अधिका-यांच्या कर्तृत्वाचा इतिहासही प्रेरणादायी आहे़ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पदी महिला असेल तर तिथे अधिक शिस्तबद्ध कारभार होताना दिसतो़ तसेच महिलांना गुन्हा नोंदविताना अधिक सुरक्षितही वाटते़ गेल्या काही वर्षांत महिलांवर होणाºया अत्याचाराचे प्रमाण वाढताना दिसते़ समाजात सर्वच पातळीवर महिलांची एकीकडे प्रगती होत आहे तर दुसरीकडे त्यांच्यावर होणाºया अन्यायाची प्रकरणे वाढत आहेत. यावर आळा घालण्यासाठी पोलिसांकडूनच मोठ्या अपेक्षा ठेवल्या जातात़ नव्या आठ रणरागिणींची निवड या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरते़ मागे एकदा पोलीस हवालदार सुनील मोरेने पोलीस ठाण्यातच एका मुलीवर बलात्कार केला़ न्यायालयाने त्याला शिक्षाही ठोठावली़ मात्र त्या घटनेनंतर पोलिसांच्या विश्वासार्हतेबद्दल मोठ्या प्रमाणात नकारात्मक चर्चा झाली होती़ महिलांमध्ये पोलिसांविषयी विश्वासार्हता राहिली नव्हती़ दुसºया एका घटनेत एका महिला पोलिसासोबत रेल्वे पोलिसानेच गैरवर्तन केले़ या गैरवर्तनाची सत्यता पडताळणीसाठी उच्च न्यायालयात त्या महिलेला याचिका करावी लागली़ पोलिसाविरोधातच त्या महिला पोलिसाला पुरावे सादर करावे लागले़ अखेर न्यायालयाने गैरवर्तन करणाºया पोलिसाला दोषी ठरवले़ आता मात्र पोलीस ठाण्याच्या प्रमुख म्हणून या महिला अधिकाºयांना महिला सक्षमीकरणासाठी ठोस निर्णय घेता येतील़ किमान त्यांच्या कार्यक्षेत्रातील महिला अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना त्या नक्कीच करू शकतील़ हिंगोलीच्या महिला पोलीस अधीक्षक सुजाता पाटील यांना मुंबईतील रिक्षाचालकाच्या मुजोरीमुळे नाहक त्रास सहन करावा लागला़ मुंबई पोलिसांनीही त्यांना सहकार्य केले नाही़ डी़ एऩ नगर पोलीस ठाण्यात पाटील यांना चांगली वागणूक मिळाली नाही़ अखेर त्यांनी दुसºया एका रिक्षाला अधिक पैसे मोजून घर गाठले़ पाटील यांनी सोशल मीडियावर त्यांना आलेला अनुभव लिहिला़ प्रसारमाध्यमांनी याची दखल घेतल्यानंतर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले़ महिला पोलिसांच्याच हाती जर पोलीस ठाण्याचा कारभार असेल तर असे प्रसंग भविष्यात घडणार नाहीत़ तेव्हा या महिला पोलीस अधिका-यांना इतरांची साथ कशी मिळेल, यावरही त्यांच्या यशापयशाची आकडेवारी अवलंबून आहे़ या निर्णयाचे समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. या कौतुकाचे त्या चीज करतील अशी आशा तूर्त बाळगायला हरकत नाही़

Web Title: Honor of 'women power'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.