आभामंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:07 AM2018-04-27T00:07:41+5:302018-04-27T00:07:41+5:30

प्रत्येक पदार्थाभोवती एक शक्तीचे प्रकाशित वलय निर्माण होत असते.

Hierarchy | आभामंडळ

आभामंडळ

Next

प्रा. डॉ. संदीप ताटेवार|
पदार्थविज्ञानाच्या शास्त्रानुसार प्रत्येक पदार्थ आपल्यापासून शक्ती परावर्तित करीत असतो. वैश्विक शक्तीसुद्धा आपल्यामध्ये अंतर्भूत असते. त्यामुळे प्रत्येक पदार्थाभोवती एक शक्तीचे प्रकाशित वलय निर्माण होत असते.
प्रकाशाचे वलय प्रत्येक माणसाभोवती निर्माण होत असते, यालाच आभामंडळ, प्रभावमंडळ किंवा औरा असे म्हटल्या जाते. आभामंडळचा उल्लेख शास्त्र पुराणातही केल्या गेला आहे. आपले आभामंडळ आपल्यासोबत २४ तास असते. आपले आभामंडळ हे विविध रंगांनी व त्याच्या प्रखरतेने, आकाराने बनले असते व त्याची जाडीसुद्धा कमी जास्त असते. संत महात्मा यांच्या आभामंडळची जाडी काही किलोमीटर व साधारण माणसाच्या आभामंडळची जाडी काही इंचापर्यंत असू शकते. प्रत्येक माणसाच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक व भावनिक अवस्थेनुसार आभामंडळ बदलत असते. आपल्या या चार अवस्था जेवढ्या पवित्र होत जातात तेवढ्या प्रमाणात आपले आभामंडळ चांगले होत जात असते. आभामंडळ म्हणजे आपल्याभोवती निर्माण झालेले एक सुरक्षा कवच होय कारण जेवढे आपले आभामंडळ चांगले व जास्त जाडीचे तेवढा आपल्यावर नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी प्रमाणात पडत असतो. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढत जात असते. आपल्या आभामंडळाचा फोटो कीर्लीयान फोटोग्राफीद्वारे घेता येऊ शकतो.
आजकाल तर साध्या फोटोवरून सुद्धा आधुनिक स्वॉफ्टवेअरद्वारे आभामंडळचा फोटो घेता येतो. जेव्हा आपण आजारी, दु:खी, निराश, हिंसक, क्रोधी, मत्सरी, नकारात्मक असतो त्यावेळेस आपले आभामंडळ चांगले नसते. मात्र जेव्हा आपण आनंदी, उत्साही, सकारात्मक, प्रेमळ, आध्यात्मिक असतो तेव्हा त्यामध्ये शक्तीचा प्रवाह सुरळीत आढळतो व आभामंडळ चांगले होते.
आभामंडळाच्या फोटोच्या अभ्यासावरून आपली शक्ती शरीराच्या कोणत्या अवयवात खंडित झालेली आहे व भविष्यात आपल्याला होणाऱ्या आजाराचे निदान करता येते. रेकी या उपचार पद्धतीत आभामंडळ शुद्ध करून उपचार केला जातो .प्राणायाम, ध्यानधारणा, सत्संग, योग अभ्यास यासारख्या उपायांनी आपली आध्यात्मिक शक्ती वाढवून आपले आभामंडळ चांगले करता येते. म्हणूनच आपल्या व्यावहारिक जीवनात अध्यात्माला अनन्य साधारण महत्त्व आहे.

Web Title: Hierarchy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.