सेन्सेक्ससारखाच कर्जमाफीचा आकडा अधूनमधून होतो कमी-जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 02:00 AM2017-09-21T02:00:58+5:302017-09-21T02:01:00+5:30

‘कर्जासाठी आत्महत्या’, ‘मोदी सरकार’ असा मजकूर सागाच्या पानावर लिहित टिटवी (घाटंजी) येथील प्रकाश मानगावकर या तरुण शेतक-याने परवा आत्महत्या केली. आत्मसन्मान दुखावलेल्या प्रकाशच्या आत्महत्येनंतर सरकारच्या डोळ्यात ‘प्रकाश’ पडला की नाही, हे निश्चित सांगता येणार नाही.

The debt waiver is like a Sensex | सेन्सेक्ससारखाच कर्जमाफीचा आकडा अधूनमधून होतो कमी-जास्त

सेन्सेक्ससारखाच कर्जमाफीचा आकडा अधूनमधून होतो कमी-जास्त

Next


‘कर्जासाठी आत्महत्या’, ‘मोदी सरकार’ असा मजकूर सागाच्या पानावर लिहित टिटवी (घाटंजी) येथील प्रकाश मानगावकर या तरुण शेतक-याने परवा आत्महत्या केली. आत्मसन्मान दुखावलेल्या प्रकाशच्या आत्महत्येनंतर सरकारच्या डोळ्यात ‘प्रकाश’ पडला की नाही, हे निश्चित सांगता येणार नाही. कारण सरकार सध्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’च्या आकडेमोडीत गर्क आहे. कर्जमाफीचा नेमका आकडा किती हे अद्याप कुणीही सांगू शकत नाही. सेन्सेक्सचा आकडा जसा कमी जास्त होतो तसा कर्जमाफीचा आकडा अधूनमधून कमी जास्त होत असतो. तो अद्यापही स्थिरावलेला नाही. तो वाढवायचा असेल तरी उत्तर प्रदेशातील ‘योगी’फॉर्म्युला महाराष्ट्रातही अमलात आणावा लागेल. तिथे दोन ते दहा रुपये कर्जमाफीचे सर्टिफिकेट मिळविणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. हे वास्तव कानावर पडताच शेतकरी आणि जनसामान्यांच्या मुखातून ‘श्री’ हरी... ऐवढेच बाहेर पडले.
मात्र कालपरवापर्यंत सरकारसाठी कायद्याची भाषा बोलणारे राज्याचे माजी महाधिवक्ता आणि विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘रक्ताक्षरी’ अभियानाच्या समारोप्रसंगी सरकारला शिव्या हासडल्या. शेतात रक्त आटवणाºया शेतकºयांसाठी अणे यांचे ‘ब्लडप्रेशर वाढले. त्यांनी सरकारची लायकी काढली. ‘अच्छे दिन’ आणायला पैसे लागतात. राज्याच्या एकूण उत्पन्नापैकी ६० टक्के पैसा पगारावर व कर्ज फेडण्यासाठी जातो. उरलेले ४० टक्के जीएसटीमुळे केंद्राने नेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला केंद्राकडे भीक मागावी लागतेय, अशी सेडेतोड टीका अणे यांनी फडणवीस सरकारवर केली. अणे यांचे भाषण ऐकल्यावर विदर्भवादी भाजप नेत्यांनी ‘श्री’ हरी... म्हणत निश्चितच दीर्घ श्वास सोडला असेल. मात्र सध्या कोणत्याही निवडणुका नसल्याने स्वतंत्र विदर्भाचा ढोल वाजविणारे विदर्भवादी भाजप नेते विकासाच्या मार्गात व्यस्त आहेत. इकडे अडगळीत पडल्यासारखे वाटत असल्याने विदर्भातील निवडक काँग्रेस नेत्यांनी ‘चाय पे चर्चा’ करीत विदर्भ प्रदेश काँग्रेसचा फटाका फोडत कॉँग्रेस हायकमांडचे लक्ष वेधले आहे. विदर्भाचे नाव पुढे करीत त्यांनी प्रदेश काँग्रेसला टार्गेट केले आहे. सत्तेत कॉँग्रेस असो वा भाजप, विदर्भात केवळ मतांचे राजकारण झाले, हे येथील मतदारही जाणतो. मात्र तो सध्या महागाईने त्रस्त आहे. पेट्रोल-डिझेलच्या भडक्याने सामान्यांचे ‘ब्लड प्रेशर’ वाढले आहे. डाळीची डोकेदुखी पुन्हा सुरू झाली आहे. अजून दसरा-दिवाळी बाकी आहे. विकासपर्वात कधी काय होईल याचा नेम नाही. मात्र शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत तर बाजार बेभाव असल्याने सामान्य माणून ‘श्री’ हरी... म्हणत गप्प आहे. या साºयात सरकार मात्र पं.दीनदयाल आयुष मधुमेह जागृती अभियानात व्यस्त आहे.

Web Title: The debt waiver is like a Sensex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.