काँग्रेसयुक्त भाजपा हेच खरे

By संदीप प्रधान on Fri, December 01, 2017 12:18am

विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने माधव भंडारी दु:खात उसाचा रस पित बसले आहेत. तेवढ्यात अत्यंत मृदु स्वरात त्यांच्या कानावर हाक ऐकू येते...

विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने माधव भंडारी दु:खात उसाचा रस पित बसले आहेत. तेवढ्यात अत्यंत मृदु स्वरात त्यांच्या कानावर हाक ऐकू येते... माधव... माधव... भंडारी दचकून इकडे तिकडे बघतात तर त्यांना गांधीजी दिसतात. माधवराव : दिलीप प्रभावळकर आज इकडे कुठे आणि हे काय चक्क बापूंच्या वेशात. काय फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती की काय? (खिन्न हसतात) बापू : मी प्रभावळकर नाही. मी ओरिजनल बापू अर्थात मोहनदास करमचंद गांधी. माधवराव : काय चेष्टा करताय राव. विधान परिषदेची उमेदवारी मिळणार... मिळणार म्हणून आशेला लावून केलेली चेष्टा पुरी नाही झाली का? बापू : मला सगळं कळलं म्हणूनच तर मी तुम्हाला भेटायला आलो. तुम्हाला वेळीच जागं करायला आलो. माधवराव : चला क्षणभर आपण मानू की, तुम्ही खरेखुरे गांधीजी आहात. पण मी पडलो संघवाला. कट्टर नथुरामवादी. मग तुम्ही कशाला आलात मला जागं करायला. बापू : तुमचे विचार माझ्या विचारांपेक्षा भिन्न असतील. पण तुमच्या विचारांवरील निष्ठा पक्क्या आहेत. तुम्ही जेव्हा जेव्हा नथुरामचा विचार केला तेव्हा तेव्हा तुम्हाला माझे स्मरण करावेच लागले. हेच काय ते तुमच्या माझ्यातील नाते. माधवराव : बापू, तुम्ही म्हणताय की, तुम्ही मला जागं करायला आलाय. पण वेळ निघून गेली. माझ्याऐवजी दोनशे खोके गांधी असलेल्या लाडोबाला पक्षाने उमेदवारीचा प्रसाद दिला. मागेही निष्ठावंतांच्या गळ्यावर सुरी फिरवली गेलीच. बापू : ही सर्व कहाणी मला ठाऊक आहे. माधवराव : मग आता? बापू : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून तुम्ही संघ-भाजपाची मंडळी ‘काँग्रेसमुक्त भारता’करिता आपली सर्व शक्ती पणाला लावताय. पण काँग्रेस ही प्रवाही विचारधारा असून ती त्या त्या वेळच्या समाजाच्या अवस्थेचे प्रतिबिंब दाखवते. मला अभिप्रेत काँग्रेस आजची काँग्रेस नाही. पण ‘काँग्रेसमुक्त भारत’ निर्माण करता करता तुम्ही ‘काँग्रेसयुक्त भाजपा’ जन्माला घातलाय ते बघा.  

संबंधित

No Confidence motion : मोदी सरकारने विश्वास जिंकला, पण टेन्शन वाढलं
No Confidence Motion: राहुल गांधींची मोदींना 'जादूची झप्पी' नव्हे 'झटका' होता - संजय राऊत
No Confidence Motion: गळाभेटीनंतर राहुल गांधींनी का मारला डोळा?
अहमदपूरच्या उपनगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल
No Confidence Motion : फोडा आणि राज्य करा हेच मोदी सरकारचे काम - मल्लिकार्जुन खर्गे

संपादकीय कडून आणखी

दिव्याखाली अंधार...
आमची उंची तुम्ही ठरवणार तर...
सतरा मजलीतील संग्राम
चांगली सुरुवात !
सावळ्यागोंधळावर ठपका

आणखी वाचा