वर्णांध व धर्मांधांचे लोकशाहीला आव्हान, ट्रम्प यांच्या अविवेकी व अहंमन्य स्वभावामुळे घटली लोकप्रियता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 03:51 AM2017-08-22T03:51:20+5:302017-08-22T03:51:49+5:30

शॉर्लेटव्हिले या अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील मोठ्या शहरात गो-या लोकांच्या वर्णविद्वेषी संघटनांनी तेथील कृष्णवर्णीयांवर जे अत्याचार केले त्यांचा निषेध करण्याऐवजी ‘दोन्ही बाजूंनी काही चांगले लोक आहेत’ अशी मखलाशीवजा

 Challenges of colorful and fanatic democracy, due to Trump's indecipherable and egoistic nature, decreased popularity | वर्णांध व धर्मांधांचे लोकशाहीला आव्हान, ट्रम्प यांच्या अविवेकी व अहंमन्य स्वभावामुळे घटली लोकप्रियता

वर्णांध व धर्मांधांचे लोकशाहीला आव्हान, ट्रम्प यांच्या अविवेकी व अहंमन्य स्वभावामुळे घटली लोकप्रियता

Next

शॉर्लेटव्हिले या अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील मोठ्या शहरात गो-या लोकांच्या वर्णविद्वेषी संघटनांनी तेथील कृष्णवर्णीयांवर जे अत्याचार केले त्यांचा निषेध करण्याऐवजी ‘दोन्ही बाजूंनी काही चांगले लोक आहेत’ अशी मखलाशीवजा भाषा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वापरली तेव्हा त्या देशातील सा-या उदारमतवादी लोकांएवढेच त्यांच्या रिपब्लिकन पक्षातील लोकप्रतिनिधीही त्यांच्याविरुद्ध निषेधाची भूमिका घेऊन उभे राहिले. ट्रम्प यांच्या अविवेकी व अहंमन्य स्वभावामुळे तशीही त्यांची लोकप्रियता ३१ टक्क्यांएवढी खाली आली आहे. त्यांना आपल्या देशाची अंतर्गत व आंतरराष्ट्रीय अशी दोन्ही धोरणे पुरेशी कळत नाहीत, अध्यक्षपदाच्या जबाबदाºयांचे त्यांना पुरेसे भान आले नाही आणि लोकनियुक्तीने अध्यक्ष लाभल्यानंतरही त्यांच्यातला धंदेवाईक बिल्डर अजून थांबला नाही अशी टीका त्यांच्या पक्षातील अनेक ज्येष्ठ सिनेटरांनी व हाऊसमधील लोकप्रतिनिधींनी याआधीच केली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार हिलरी क्लिंटन यांना तुरूंगात टाकण्याची दिलेली धमकी अजून साºयांच्या स्मरणात आहे. त्या निवडणुकीत त्यांनी घेतलेली वा त्यांना मिळालेली रशियाची साथही तेथे चर्चेत आहे. त्यांना उत्तर कोरिया हाताळता येत नाही, नाटो सांभाळता येत नाही, मध्य आशियाबाबत योग्य त्या भूमिका घेणे जमत नाही आणि देशातील काळ््या-गोºयांच्या संबंधांबाबतही दृढ राहता येत नाही हे साºयांना कळून चुकले आहे. त्याचमुळे त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालविण्याची भाषाही तेथे बोलली जाऊ लागली आहे. आताच्या त्यांच्या छद्मी उद््गारांबाबत सिनेटर बॉब कोकर या सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षांनीच निषेधाचा सूर लावला आहे. त्यांच्याच पक्षाचे एकमेव कृष्णवर्णीय सिनेटर टॉम स्कॉट यांनीही त्यांचा निषेध नोंदवला आहे. शिवाय सीएनएन, न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट यासारख्या त्यांच्या टीकाकार माध्यमांसोबत मुर्डॉक यांची माध्यमेही त्यांच्याविरुद्ध उभी राहिली आहेत. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स किंवा (आता) जर्मनी हे जगातले प्रगल्भ लोकशाही देश म्हणून ओळखले जातात. तेथे धर्मांध, वर्णांध वा कोणतीही वर्चस्ववादी भूमिका सामान्य जनतेलाही सहन होत नाही. अशा देशांत ट्रम्प यांनी द्वेषभावना जागवून अमेरिकेच्या अध्यक्षपदावर निवडून येणे हीच मुळात जगाला धक्का देऊन गेलेली बाब आहे. मात्र त्यांची अहंमन्यता आणि त्यांचा उघड होऊ लागलेला वर्णांधपणा यामुळे त्यांची महत्त्वाची विधेयके व धोरणे विधिमंडळात नामंजूर होऊ लागली आहेत. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी लागू केलेली आरोग्यसेवेची योजना ट्रम्प यांना मोडीत काढायची आहे. परंतु विधिमंडळ त्यांना साथ देत नाही आणि तेही विधिमंडळाला नावे ठेवण्याची संधी सोडत नाहीत. त्यांच्या काही मंत्र्यांनी, सहकाºयांनी व प्रवक्त्यांनी त्यांच्या हडेलहप्पीपणाला कंटाळून राजीनामे दिले आहेत आणि अनेकजण तशा तयारीने थांबले आहेत. ट्रम्प यांनी गोºया वर्णवर्चस्ववादी संघटनांचा, कू क्लक्स क्लॅनसारख्या हिंस्र टोळ््यांचा स्पष्ट शब्दात निषेध न केल्याचा संताप तेथील राजकारणात आहे. प्रगल्भ व प्रगत लोकशाही देश सर्वधर्मसमभावाएवढीच सर्ववर्णसमभावाची भावना जोपासत असतात. त्यांना कोणत्या धर्माची अवहेलना, नालस्ती वा त्याच्याविषयीचे अनुद््गार चालत नाहीत. ट्रम्प यांनी सात मुस्लीम देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश देण्याचे नाकारले तेव्हा मुस्लीम जगच त्यांच्या विरोधात गेले नाही, सारा युरोपच त्यांच्या विरोधात गेला. शिवाय त्यांच्या पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते व लोकप्रतिनिधीही त्यांच्याविरुद्ध उभे राहिले. तेथील न्यायालयांनीही अध्यक्षांचे त्याविषयीचे आदेश घटनाबाह्य म्हणून नाकारले. धर्मांधता, वर्णांधता किंवा धर्मद्वेष व वर्णविरोध या गोष्टी मानवी मूल्यांच्या विरोधात जाणाºया आहेत. आताचे जग व्यक्तीचे अधिकार व तिचे स्वातंत्र्य मान्य करणारे आहे. संघटना, संस्था व धर्म-पंथासारख्या व्यवस्थांचे व्यक्तीवरील वर्चस्व त्यांनी अमान्य केले आहे. मानवी मूल्यांचा सन्मान हाच विकसित जगाने स्वीकारलेला श्रेष्ठ धर्म आहे. त्याविरुद्ध जाणाºया तालिबान, बोको हराम किंवा इसीससारख्या धर्मांधांच्या कडव्या संघटना माणुसकीच्या शत्रू आहेत. त्यांचा पाडाव करण्याऐवजी ट्रम्प व त्यांच्यासारखेच जगातले आणखी काही पुढारी आपल्याच देशातील अतिरेक्यांना पाठिंबा देत असतील, त्यांच्याविषयी ममत्व वा मौन राखत असतील तर तेही या मूल्याचे शत्रू आहेत व मनुष्यधर्माचे विरोधक आहेत, असा अमेरिकेतील आताच्या ट्रम्पविरोधी उठावाचा धडा आहे. धर्म व जातीच्या नावावरचे राजकारण भारतातही आहे. ते प्रसंगी सत्तेवर आलेलेही आपण अनुभवले आहे. अन्य धर्मांची पूजास्थाने पाडणे, जाळणे वा जमीनदोस्त करणे यासारखे पराक्रम त्यांच्याही नावावर आहेत. अल्पसंख्य वर्गांना लक्ष्य बनवून कोणत्याही निमित्ताने का होईना त्यांची हत्या वा छळ आपल्या येथेही झालेला आपण पाहिला आहे. आपलेही पुढारी ट्रम्पसारखेच त्याविषयी मौन पाळताना आपल्याला दिसले आहेत. जगातला उदारमतवाद कमी होणे आणि त्यातले एकारलेपण वाढत जाणे हे लोकशाह्यांसमोरचेच आव्हान आहे. त्याला उत्तर देण्यासाठी साºया लोकशाहीवाद्यांना संघटितपणे एकत्र येणे आता गरजेचे आहे.

Web Title:  Challenges of colorful and fanatic democracy, due to Trump's indecipherable and egoistic nature, decreased popularity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.