रोखे लवादातील प्रकरणे क्लिकवर, एनएसईचे विशेष ई-बूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:47 AM2017-12-11T00:47:59+5:302017-12-11T00:54:46+5:30

रोख्यांसंबंधी तक्रारींचा निपटारा रोखे तदर्थ लवादात (सॅट) होतो. या लवादातील प्रकरणांची अत्यंत क्लिष्ट अशी माहिती आता एकत्र उपलब्ध झाली आहे. त्यासाठी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (एनएसई) विशेष ई-बुक सादर केले आहे.

 In case of bond arbitrations, click on the NSE's special e-book | रोखे लवादातील प्रकरणे क्लिकवर, एनएसईचे विशेष ई-बूक

रोखे लवादातील प्रकरणे क्लिकवर, एनएसईचे विशेष ई-बूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रोख्यांसंबंधी तक्रारींचा निपटारा रोखे तदर्थ लवादात (सॅट) होतो. या लवादातील प्रकरणांची अत्यंत क्लिष्ट अशी माहिती आता एकत्र उपलब्ध झाली आहे. त्यासाठी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (एनएसई) विशेष ई-बुक सादर केले आहे.
रोखे अर्थात, सिक्युरिटी संदर्भातील तक्रारी लवादात सादर केल्या जातात. त्यामधील प्रकरणे लाखोंच्या संख्येने असतात, ते क्लिष्टदेखील असतात. अशी प्रकरणे शेअर बाजार नियामक मंडळाच्या (सेबी) संकेतस्थळावर वेळोवेळी टाकली जातात, पण सेबी सर्वच प्रकरणे संकेतस्थळावर टाकत नाही, तसेच ही प्रकरणे लाखोंच्या संख्येने असल्याने नेमके प्रकरण शोधणे अत्यंत क्लिष्ट काम असते. आता सामान्य गुंतवणूकदार, गुंतवणूक सल्लागार, विधि संस्था यांना या प्रकरणांचा अभ्यास करता यावा, यासाठी एनएसईने पुढाकार घेत, विशेष ई-बुक सादर केले आहे.
सॅटमधील प्रत्येक तक्रार, त्यामधील सुनावणी व निकाल या ई-बुकमध्ये आहे. यासोबतच सेबीच्या संकेतस्थळावरील सॅटची माहिती विखुरलेल्या स्वरूपात आहे. एनएसईच्या ई-बुकमध्ये मात्र, ही माहिती सेबीच्या नियमावलींच्या वर्गीकरणासह उपलब्ध आहे. कंपनी विकत घेण्यासंबंधी, दोषयुक्त व्यवसाय पद्धती, शेअर दलाल नियमावली, सेबी कायदा आणि म्युच्युअल फंडासंबंधीचे नियम यांचा त्यात समावेश आहे. गुंतवणूक, गुंतवणूक संस्था, विधि संस्था, म्युच्युअल फंड सल्लागार या श्रेणींनुसार सॅटमधील कुठलाही निकाल या ई-बुकमध्ये एकत्र पाहता येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही.एम. कानडे, सेबीचे सदस्य जी. महालिंगम, सेबीचे कार्यकारी संचालक अनंता बरुआ, एनएसईचे अध्यक्ष अशोक चावला व एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ विक्रम लिमये यांच्या हस्ते एनएसईमध्येच या ई-बुकचे प्रकाशन केले.
 

Web Title:  In case of bond arbitrations, click on the NSE's special e-book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.