'अजातशत्रू' - अटलबिहारींना जयंतीदिनी अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 03:59 AM2018-08-18T03:59:39+5:302018-12-25T09:49:46+5:30

माणसाचे मोल त्याच्या प्रस्थानानंतर होते. त्याचा चांगुलपणा तेव्हाच उठून दिसतो असे सर्वसामान्य माणसाबद्दल बोलले जाते; पण अर्धशतकात राजकीय अवकाशात तळपत राहूनही चांगुलपणा आणि केवळ चांगुलपणा टिकवणारे नाव अटलबिहारी वाजपेयी.

Ajatshatru | 'अजातशत्रू' - अटलबिहारींना जयंतीदिनी अभिवादन

'अजातशत्रू' - अटलबिहारींना जयंतीदिनी अभिवादन

googlenewsNext

माणसाचे मोल त्याच्या प्रस्थानानंतर होते. त्याचा चांगुलपणा तेव्हाच उठून दिसतो असे सर्वसामान्य माणसाबद्दल बोलले जाते; पण अर्धशतकात राजकीय अवकाशात तळपत राहूनही चांगुलपणा आणि केवळ चांगुलपणा टिकवणारे नाव अटलबिहारी वाजपेयी. त्यांच्याविषयी कधीही कुणीही कटुपणे बोलल्याचे आढळत नाही की, ते कधीही विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनले नाही मग ती टीका राजकीय असो की, वैयक्तिक. त्यांच्याविषयी सर्वांच्या मनात आदरभावच होता. त्यांच्या जाण्याने हा सारा आदरभाव उमळून बाहेर आलेला नाही, तर त्यांच्याप्रति सर्वांच्या सद्भावनेचा हा प्रवाह अखंड वाहात होता. ते सत्तेवर म्हणजे पंतप्रधानपदासारख्या काटेरी अधिकारपदावर असतानाही त्यांना कधी टीकेचे धनी व्हावे लागले नाही किंवा त्यांच्या निर्णयावर हेतूबद्दल कुणी शंका व्यक्त केली नाही.

राजकीय आणि सामाजिक नीतिमूल्यांचा पारदर्शकपणा त्यांनी स्वीकारल्यामुळे हे शक्य झाले म्हणून प्रदीर्घ राजकीय जीवनात राजकीय शत्रू नसणे ही खरी मिळकत म्हणावी लागेल. राजकारणात टिकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, लटपटी, मूल्यांना घालवी लागणारी मुरड या गोष्टींना अटलजींच्या जीवनात थारा नव्हता तर राजकीय मूल्य व नीतिमत्तेची चाड होती म्हणून १३ दिवसाचे सरकार जेव्हा धोक्यात आले त्यावेळी विचलित न होता त्यांनी सत्ता सोडली. अनेक संधिसाधू कायम राजकीय कुंपणावर संधीची वाट पहात बसलेले असतात; पण त्यांना संधी न देता अटलजींनी सत्ता सोडली हे त्यांच्यासारखा राजकारणीच करू जाणे. या ठिकाणी दुसरा असता तर राजकीय खरेदी विक्रीचा खुलेआम बाजार भरवला असता. सत्ता पाहिजे पण मूल्याधिष्ठित ही त्यांची भूमिका समर्थकांसमवेत विरोधकांनाही भावली. सामान्य माणसाच्या मनात जे चालते त्याला त्यांनी प्रतिसाद दिला म्हणूनच या माणसाची उंची आभाळ व्यापून टाकले. खºया अर्थाने ते अजातशत्रू एवढ्या उंचीवर जाऊनही साधेपणा जपणारा, सामान्य कार्यकर्त्याला, माणसाला आपला वाटणारा हा माणूस धकाधकीच्या राजकीय प्रवासात अनेकांशी कौटुंबिक स्रेहबंध जाणीवपूर्वक सांभाळताना दिसला हे त्यांचे वैशिष्ट्य. अशा स्रेहबंधांच्या आडव्या उभ्या धाग्यातूनच त्यांचे हे सोनसळी व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर उभे राहते. गुजरातच्या दंगलीवर स्वपक्षीयांना खडसावणारे अटलजीच आणि १९७२ च्या युद्धानंतर संसदेत इंदिराजींना ‘दुर्गा’ संबोधणारेही अटलजीच. एकच व्यक्तिमत्त्वाच्या या दोन बाजू आपण पाहिल्या. विरोधकांचाही सन्मान करण्याची ही वृत्ती फक्त त्यांच्या ठायी होती म्हणून त्याचे मोठेपण, माणूसपण हे पक्षातित ठरते. हिंदुत्वावादी विचाराचे असूनही ते विरोधकांनाही आपले वाटत याला कारण राजकीय सुसंस्कृतपणा. १९९८ ते २००४ या सहा वर्षाच्या ३० पक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे नेतृत्व अटलजींनी केले. हे सारे घटक पक्ष काही भाजपच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचे नव्हते तरीही या सरकारने कार्यकाळ पूर्ण केला. मधूनच काही पक्ष बाहेरही पडले होते; कुणी अटलजींच्या कार्यपद्धतीवर टीका केली नाही की, जॉर्ज फर्नांडिस ममता बॅनर्जी, जयललिता, नितीश कुमारांसारखे सैध्दांतिक पातळीवरील भाजपचे विरोधक या सरकारमध्ये सहभागी झाले होते ते केवळ अटलजींमुळे. अशा गोष्टी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकारण करणाºया नेत्यामध्ये अभावाने आढळतात, येथेच त्यांचे माणूसपण अधिक उठून दिसते. म्हणून आज भाजपचे अटलबिहारी नव्हे तर सर्व सामान्य भारतीयांचे अटलजी गेले आहेत, आपला सारा चांगुलपणा ठेवून.

खुलुस वो प्यार के मोती लुटाके चलता है
सभी को अपने गलेसे लगाके चलता है।
किसी को हो न सका उसके कद का अंदाजा
वो आॅसमा है मगर सर झुका के चलता है।

Web Title: Ajatshatru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.