जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळांची गुणवत्ता वाढविण्याची गरजेची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:44 PM2018-02-25T13:44:59+5:302018-02-25T13:44:59+5:30

प्राची साठे : वाजदरे येथील शाळेतील सौर पॅनल उदघाटन प्रसंगी प्रतिपादन

Zilla Parishad's digital schools need to increase the quality | जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळांची गुणवत्ता वाढविण्याची गरजेची 

जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळांची गुणवत्ता वाढविण्याची गरजेची 

googlenewsNext
ठळक मुद्देअतिथींची सजविलेल्या बग्गीतून मिरवणूक, दात्यांचा गौरवजिल्ह्यातील लोकसहभागातून डिजिटल व सौर शाळांच्या उपक्रमाची वाहवा पटसंख्या वाढविणाºया शिक्षक, केंद्रप्रमुखांचा मुंबईत होणार गौरव 

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर, जि.धुळे : जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल होणे हे अत्यंत गरजेचे असून  धुळे जिल्ह्यातील सर्व जि.प. शाळा डिजिटल झाल्यात. आता तर या शाळा सौर शाळा होत असून, यासाठी प्रेरणा सभा हा अभिनव उपक्रम राबवून सर्वांच्या सहकार्याने शाळांचे रूप पालटत आहे. त्यासाठी प्रयत्नशील असणारे हर्षल विभांडिक हे या अभियानाचे ‘आयकॉन’ ठरत आहेत. सर्वत्र ग्रामस्थांनीही भरीव सहभाग देत सहकार्य केले. त्यामुळे मरगळलेल्या जि.प. शाळांचे रूपच बदलले आहे. आता शिक्षकांनी देखील याचा उपयोग करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी प्राची साठे यांनी व्यक्त केली.
साक्री तालुक्यातील वाजदरे येथील डिजिटल जि.प.शाळेत सौर पॅनल बसवण्यात येत असून त्याच्या उदघाटन प्रसंगी शिक्षणमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी त्या  बोलत होत्या. 
या प्रसंगी पुणे येथील विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ.सुनील मगर, शिक्षण विभागाचे कार्यक्रम अधिकारी सिद्धेश वाडकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नूतन बगाडे, डिजिटल व सौर शाळा अभियानाचे प्रेरक हर्षल विभांडिक, पं.स. गटनेते उत्पल नांद्रे, शिक्षणाधिकारी मोहन देसले, नाशिक जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ.विद्या पाटील, नाशिक जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र जावळे, गटशिक्षणाधिकारी बी.बी. भिल, जि.प.सदस्या उषाबाई ठाकरे, पं.स. सदस्य विश्वास बागुल, वासुदेव बदामे, सुनिता बच्छाव, प्रा.डॉ.रवींद्र ठाकरे, अ‍ॅड.शरदचंद्र शहा, वाजदरेच्या सरपंच सुमन सोनकर आदीसह ग्रामस्थ तसेच निजामपूर, दुसाने व खुडाणे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यावेळी उपस्थित होते. 
अतिथींची मिरवणूक, दात्यांचा गौरव 
प्रमुख अतिथींना सजवलेल्या बग्गीत बसवून कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. या अनोख्या स्वागताने ते सर्व भारावले. आरंभी शाळेला डिजिटल व सौर शाळेसाठी वर्गणी देणाºया दात्यांचा तसेच  विविध साहित्य उपलब्ध करणाºया दात्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
पुणे येथील विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ.सुनील मगर हे यावेळी बोलताना म्हणाले की जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा या लोकसहभागातून डिजिटल झाल्या तर राज्यात देखील जवळपास ३५० कोटी रुपये लोकसहभागातून जमले व यातून जवळपास ६२ हजार शाळा आतापर्यंत डिजिटल झाल्या आहेत. डिजिटल अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून, गुणवत्ता वाढीसाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच या डिजिटल शाळांना आता सौर शाळांची देखील जोड मिळत असून, लोकसहभागातून शाळा डिजिटल व सौर शाळा करण्याचा हा अभिनव उपक्रम देशातील इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे, असेही गौरवोदगारही त्यांनी काढले. 
शिक्षक, केंद्रप्रमुखांचा मुंबईत होणार गौरव : हर्षल विभांडिक
डिजिटल व सौर शाळा अभियानाचे प्रेरक हर्षल विभांडिक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षात ज्या शाळा सर्वाधिक पटसंख्या वाढवतील अशा जिल्ह्यातील १८ शाळांचे सर्व शिक्षक, ८ केंद्रप्रमुख व एक गटशिक्षणाधिकारी या सर्वांचा जुलै महिन्याच्या अखेरीस उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते मुंबई येथे गौरव करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.कार्यक्रमाचे संयोजन शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र देसले, बंडू मोरे, आर.जी. पवार, मनीष वसावे, पावबा बच्छाव, बाई पवार, अफ्रीन पठाण, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश बच्छाव यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थांनी केले.

 

Web Title: Zilla Parishad's digital schools need to increase the quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.