धुळ्यात मोबाईल हिसकाविणाºयांच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 01:19 PM2018-07-21T13:19:08+5:302018-07-21T13:20:31+5:30

शहर पोलीस : १७ मोबाईल, १ दुचाकीसह दोघांना अटक

You can get rid of mobile snatching in Dhule | धुळ्यात मोबाईल हिसकाविणाºयांच्या मुसक्या आवळल्या

धुळ्यात मोबाईल हिसकाविणाºयांच्या मुसक्या आवळल्या

Next
ठळक मुद्देशहर पोलिसांच्या गोपनीय शाखेची कामगिरीदोन संशयितांकडून १७ मोबाईल, १ दुचाकी हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : चालत्या गाडीवरुन मोबाईल हिसकावून पळून जाणाºया दोघा सराईत गुन्हेगारांना धुळे शहर पोलिसांच्या गोपनीय शाखेच्या पथकाने शिताफिने पकडले़ त्यांची चौकशी केली असता त्यांनी १७ चोरीचे मोबाईल, १ दुचाकी काढून दिली़ असा एकूण १ लाख २८ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल दोघांकडून जप्त करण्यात आला आहे़  अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे आणि शहर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दिली़ 
पायी मोबाईलवर बोलत असताना मोटारसायकलस्वारांनी मागावून येऊन मोबाईल हिसकावून पोबारा केला होता़ ही घटना रविवारी शहर हद्दीत घडली होती़ याशिवाय वेगवेगळ्या भागात मोटारसायकलीवरुन येऊन मोबाईल चोरीचे प्रकार वारंवार घडत आहेत़ यावर प्रतिबंध लावण्यासाठी दिवसा आणि रात्रीची गस्त वाढविण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी दिल्या होत्या़ त्यानुसार, शहर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे, हिरालाल बैरागी, यांच्यासह मिलींद सोनवणे, किरण जगताप, भिकाजी पाटील, कबीर शेख, इखलाख पठाण, मुक्तार मन्सुरी, योगेश चव्हाण, संदिप पाटील, प्रल्हाद वाघ, दिनेश परदेशी, युवराज पवार, राहुल पाटील, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी यांनी मोबाईल चोरांचा शोध घेण्यासाठी गस्त वाढविली़ मोबाईल चोरटे हे चितोड रोड भागातील श्रीराम नगरात राहत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली़ तसेच साक्री रोड भागात ते गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच सापळा लावण्यात आला आणि खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ (रा़ दंडेवालेबाबा नगर, मोहाडी, धुळे) आणि शंकर बालकिसन रेड्डी (रा़ रेल्वे स्टेशन रोड, साईबाबा चौक, धुळे) या दोघांना अटक करण्यात आली़ त्यांच्या चौकशीतून १७ मोबाईल आणि १ दुचाकी असा एकूण १ लाख २८ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ 

Web Title: You can get rid of mobile snatching in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.