पाण्यासाठी महिलांचा टॅँकरला घेराव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:00 PM2019-07-19T12:00:10+5:302019-07-19T12:00:28+5:30

कापडणे येथे पाणीबाणी : ग्रा.पं. सदस्य मात्र सहलीवर 

Wear the women's tanker for water | पाण्यासाठी महिलांचा टॅँकरला घेराव 

भगवा चौकात पाण्याचा टँकर आल्यानंतर रास्तारोको करताना महिला.

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : येथे तब्बल दीड महिन्यापासून  गावात पाणी सोडलेले नाही. म्हणून भर पावसाळ्यात गावात तीव्र पाणी टंचाई असून महिलांनी गावातील भवानी चौकात बुधवारी टॅँकर अडवून घेराव घातला. 
सध्या पाण्यासाठी महिलांना भटंकती करावी लागत आहेत. परंतू तरी देखील पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामस्थ अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. येथील  पाणी पुरवठा योजना ताब्यात घेत नाही म्हणून सरपंच भटू पाटील यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. नवीन सरपंच निवडीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसताना देखील बरेच ग्रा.पं.सदस्य सहलीला गेले आहेत. इकडे मात्र गावातील महिला  पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. 
बुधवारी शासकीय पाण्याचे टॅकर आले असता ते आपल्या भागामध्ये घेऊन जाण्यासाठी महिलांनी भवानी चौकात येऊन उत्स्फूर्त रास्तारोको आंदोलन करत पाण्याचे टॅकरला  घेराव घातला. आक्रमक होत टॅकरवर ताबा मिळवून त्यास त्यांच्या भागात नेले. यावेळी जबाबदारी झटकून सहलीस गेलेल्या ग्रा.पं.सदस्याविषयी प्रचंड रोष व्यक्त झाला.
गावात ३०-४० दिवसापासून नळांना पाणीच आलेले नाही म्हणून कापडणेकरांवर पाणीबाणीचे संकट कोसळलेले असताना दुसरीकडे मात्र सत्ताधारी पदाधिकाºयांना त्याचे काही सोयरसुतक दिसत नाही. 
गावाला पाणीटंचाईची भयकंर परिस्थिती निर्माण झाली असताना ती सोडविणे सत्ताधाºयांकडून अपेक्षित असताना त्याबाबत उपाययोजना करायचे सोडून  सत्ताधारी आपल्या राजकारणात मस्त असल्याचे चित्र आहे.
गावाला पाणी पुरवठा करणारे सर्वच स्त्रोत अटल्यामुळे पाण्याची भयंकर स्थिती निर्माण झाली आहे.  प्रशासनाकडून टॅकर सुरु करण्यात आले आहे. परंतू ३०-३५ हजार लोकसंख्येच्या गावाला तेवढे पाणी पुरत नाही. त्यामुळे  दिवसेंदिवस पाण्याची स्थिती गंभीर होत आहे. प्रशासनाकडून पाठविलेल्या टॅकरचे पाणी मिळावे म्हणून टॅकरसमोर रस्त्यावर झोपून पाण्यासाठी विनवणी करताना ग्रामस्थ दिसतात. बुधवारी  तर गावातील महिलांना भटकंती करुन देखील पाणी मिळत नसल्यामुळे त्यांनी सकाळ पासूनच येथील भवानी चौकात ठिय्या मांडला होता. पाण्याचा टॅकर आल्यानंतर महिलांनी रास्ता रोको करीत टॅकरला घेराव घातला.
महिलांची सरशी 
अचानक उदभवलेल्या या स्थितीमुळे तणावाचे  वातावरण निर्माण झाले होते. पण शेवटी महिलांपुढे सर्वांनी नमते घेत टॅकर त्यांच्या भागात पाठविण्यात आले.
एकीकडे महिला-भगिनी पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्या  असताना गावाचा कारभार पूर्ण वाºयावर दिसून येत आहे. सरपंच भटू पाटील यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी इच्छुक उमेदवार आवश्यक सदस्यांना सहलीला घेऊन गेले आहेत. 

Web Title: Wear the women's tanker for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे