धुळे महापालिकेच्या दवाखान्यात चार महिन्यांपासून लसींचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:03 PM2018-07-17T22:03:08+5:302018-07-17T22:05:13+5:30

‘अ’ जीवनसत्वाच्या लसींची जिल्हा परिषदेकडे मागणी

Vaccination of vaccine from Dhule Municipal Hospital for four months | धुळे महापालिकेच्या दवाखान्यात चार महिन्यांपासून लसींचा तुटवडा

धुळे महापालिकेच्या दवाखान्यात चार महिन्यांपासून लसींचा तुटवडा

Next
ठळक मुद्दे-एप्रिलपासून ‘अ’ जीवनसत्वाच्या लसींचा तुटवडा-जिल्हा परिषदेकडे केली मागणी-पालकांकडून मनपाला होतेय विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेच्या आरोग्य केंद्रात अ जीवनसत्वाचे डोस संपुष्टात आल्याने लसीकरण मोहिमेस ‘ब्रेक’ लागला आहे़ महापालिकेने जिल्हा परिषदेकडे ५०० बॉटल्सची मागणी केली असली तरी जिल्हा परिषदेकडूनही प्रतिसाद मिळालेला नाही़ त्यामुळे मनपात बालकांना डोस देण्यासाठी येणाºया पालकांना परत फिरावे लागत आहे़ 
मनपा आवारात असलेल्या कुटूंब कल्याण केंद्रासह १२ दवाखान्यांमध्ये प्रत्येक आठवड्यात मंगळवार व शुक्रवारी आणि इतर दवाखान्यांमध्ये आठवड्यातून एकदा शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी लसीकरण मोहिम राबविली जाते़ या मोहिमेत बालकांना विविध प्रकारच्या लसी मोफत दिल्या जातात़ त्यात क्षयरोग प्रतिबंधक लस, पोलीओ लस, कावीळ प्रतिबंधक लस, गोवर प्रतिबंधक लस, ‘अ’जीवनसत्वाच्या लसीचा समावेश असतो़ परंतु महापालिकेच्या दवाखान्यात एप्रिल महिन्यापासून ‘अ’ जीवनसत्वाच्या लसीचा साठा संपुष्टात आला आहे़ याबाबत शासनाकडे मनपाचा पाठपुरावा सुरू आहे़ 


 

Web Title: Vaccination of vaccine from Dhule Municipal Hospital for four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.