कामांत कुचराई न करण्याची दिली तंबी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:13 PM2019-05-25T22:13:44+5:302019-05-25T22:14:10+5:30

अपर पोलीस अधीक्षक । पोलिसांच्या गोपनीय शाखेची बैठक

Tragedy to not do the job! | कामांत कुचराई न करण्याची दिली तंबी!

कामांत कुचराई न करण्याची दिली तंबी!

Next

संडे हटके बातमी
लोकमत न्यूज नेटवर्क 
धुळे : निवडणुकीचा काळ आता आटोपला आहे़ वाढती गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता त्याचा तपास त्याच गतीने लावणे अपेक्षित आहे़ त्यामुळे गोपनीय शाखेच्या कर्मचाºयांनी आपल्या कामात कोणत्याही प्रकारची कुचराई करु नये़ अन्यथा, त्याची दखल घेतली जाईल, अशी तंबी अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांनी बैठकीत दिली़ 
पोलीस अधीक्षक कार्यालय येथील चिंतन हॉलमध्ये पोलिसांच्या गोपनीय शाखेची बैठक अपर पोलीस अधीक्षक डॉ़ भुजबळ यांनी घेतली़ यावेळी विभागातील कर्मचारी उपस्थित होते़ 
शहरासह जिल्ह्यात गुंडगिरीचे प्रमाण काही कमी नाही़ हातातून मोबाईल हिसकाविण्याच्या घटना घडत आहेत़ दुचाकी चोरीच्या घटना, घरफोडी, रस्तालुटीच्या घटना वाढल्या आहेत. त्याचाही छडा लावून चोरट्यांना जेरबंद करण्याची गरज आहे.  शहरात अवैध धंदेवाल्यांनी पुन्हा आपले डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे़ त्यांना सुध्दा वेळीच ठेचण्याची आवश्यकता आहे़ गोपनीय कर्मचाºयांनी आपआपल्या भागात गस्त घालण्याच्या प्रमाणात वाढ करण्याची आवश्यकता आहे़ त्याचे प्रमाण रात्रीच्या वेळेस सर्वाधिक असायला हवे़ चोरी अथवा घरफोडीच्या घटनेतील संबंधित संशयितांवर पोलिसांचा कटाक्ष हवा़ त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा चोºया अथवा घरफोड्या होत असतील तर त्यांच्यावर कायम स्वरुपी वचक निर्माण करायला हवा़ 
शहरातील संवेदनशिल आणि अतिसंवदेनशिल भागाकडे पोलिसांचे लक्ष असते, हे सर्वश्रृत आहे़ पण, त्याचवेळेस पोलिसांनी महाविद्यालयाकडेही तितक्याच गांभिर्याने पाहण्याची आवश्यकता आहे़ तरुणीच्या छेडखानीचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे़ पोलिसांनी आपला धाक कायम ठेवल्यास गुन्हेगारीच्या प्रमाणात निश्चित घट होईल़ मात्र, तसे होताना दिसत नाही़ 
जिल्ह्यातील बनावट दारुचा गोरख धंदा, धुळे, साक्री शहरातील वाढते चैनस्नॅचिंगचे प्रमाण, बसस्थानकासह परिसरात वाढणाºया चोºया, घरफोड्या, शहरासह ग्रामीण भागात भरदिवसा झालेल्या रस्ता लुटीच्या घटनेचा प्रमाण वाढतेच आहे. यावर आळा बसविण्यात अपयश मिळत आहे़ वर्षभराचा या घटनांचा क्राईम आलेख हा वाढतांना दिसत आहे. 
याकडेही गांभीर्याने लक्ष देऊन अशा घटनांवर आळा घालावा़ शहरासह जिल्ह्यातील क्राईमच्या घटनेचा वाढता आलेख खाली आणून आपल्या कामगिरीचा आलेख वाढवावा, अशी सूचनाही त्यांनी बैठकीत दिली़ 
कामांची करुन दिली जाणीव 
अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांनी गोपनीय शाखेतील कर्मचाºयांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांना कामांची जाणीव करुन दिली़ सर्व प्रकारच्या सुविधा असताना गुन्ह्याचा जलद गतीने तपास का लागत नाही? कर्मचाºयांनी एकमेकांना सहकार्य करुन तपासात हातभार लावावा अशा सूचनाही दिल्या़ 

Web Title: Tragedy to not do the job!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.