ट्रक उलटून लोखंडी पाईपखाली दबल्याने तीन जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 10:28 PM2017-09-19T22:28:28+5:302017-09-19T22:29:41+5:30

दहिवेलनजिकची घटना : महामार्गावर कोंडी

Three people were killed on the spot after truck collapsed under iron pipes | ट्रक उलटून लोखंडी पाईपखाली दबल्याने तीन जण जागीच ठार

ट्रक उलटून लोखंडी पाईपखाली दबल्याने तीन जण जागीच ठार

googlenewsNext
ठळक मुद्देदहिवेल गावापासून जवळच असलेल्या डुकरझिरे गावाजवळ महामार्गावर ट्रक उलटला़ ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात ३ जण ठार तर एक जण जखमी झाला़पाऊस आणि रस्त्यावर पडलेल्या लोखंडी पाईपामुळे वाहतुकीची कोंडी़

लोकमत न्यूज नेटवर्क
दहिवेल : दहिवेल गावापासून जवळच असलेल्या डुकरझिरे गावाजवळ महामार्गावर   ट्रक उलटला झाल्याने त्यातील लोखंडी पाईपाखाली दाबले जाऊन तीन जणांचा जागीच करुण अंत झाला. तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री साडे सात वाजेच्यासुमारास घडली़ या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ दरम्यान, त्याचवेळेस पाऊस येत असल्यामुळे मदत कार्याला अडथळा येत होता़   
पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी वापरले जाणारे लोखंडी पाईप घेऊन  जीजे १२ बीव्ही ६१८३ क्रमांकाचा १२ चाकी ट्राला  दहिवेलकडून धुळ्याकडे जात होता़ तो महामार्गावर डुकरझिरे गावाजवळ अचानक उलटला. ट्रालावरील लोखंडी पाईप खाली पडले. त्याखाली दाबले जाऊन  ट्रालाच्या बाजुने चालणारे अर्जुन अशोक सोनवणे (१८), विनोद भाईमल मालते (३०), उगलाल रामलाल गायकवाड (३५) सर्व रा. मालणगाव या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दादाजी विश्वास भील रा. मालणगाव हे जबर जखमी झाले आहेत़ ट्रालाखाली एम.एच.१००४ क्रमांकाची दुचाकी सुध्दा आढळून आली आहे़ या चार जणांपैकी दोन जण या मोटारसायकलवर जात असतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
जेसीबीची मदत
घटनेचा आवाज येताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली होती़ पाईपखाली दबल्या गेलेल्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली होती़ जेसीबी आल्यानंतर मदत कामाला वेग आला होता़ 
महामार्गावर कोंडी
रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे रस्त्यावर इतरत्र पाईप पडले़ दुचाकीही दाबली गेली होती़ रस्त्यावर आलेले पाईप आणि पलटी झालेला ट्रक यामुळे महामार्गावर कोंडी झाली होती़ पावसामुळे मदत कार्याला अडथळा येत होता़ 

Web Title: Three people were killed on the spot after truck collapsed under iron pipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.