धुळ्यातील बाजार समितीत दोन गट भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:05 PM2019-01-15T12:05:57+5:302019-01-15T12:07:21+5:30

तणावपुर्ण वातावरण : पोलिसांचा बंदोबस्त तैनात

There are two groups in the Dhule market committee | धुळ्यातील बाजार समितीत दोन गट भिडले

धुळ्यातील बाजार समितीत दोन गट भिडले

Next
ठळक मुद्देबाजार समितीच्या आवारातील घटनादोन गटातील हाणामारीत एकास दुखापत

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दोन गटात झालेल्या वादातून हाणामारीची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली़ मंगळवारचा बाजार असल्याने अनेकांची धावपळ झाली़ घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने दाखल झाले असून बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे़ बाजार समितीच्या आवारात तणावपुर्ण शांतता आहे़ घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, आझादनगर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे़ हाणामारीत एकास दुखापत झाली आहे़ 

Web Title: There are two groups in the Dhule market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.