लोकसंग्रामच्या उमेदवाराच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 09:26 PM2018-12-07T21:26:02+5:302018-12-07T21:26:25+5:30

रोकडसह दागिने लंपास : गुरुवार रात्रीची घटना

Theft of the house of the organizer of the folk concourse | लोकसंग्रामच्या उमेदवाराच्या घरी चोरी

लोकसंग्रामच्या उमेदवाराच्या घरी चोरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आमदार अनिल गोटे यांच्या प्रचार सभेसाठी गेलेल्या लोकसंग्रामच्या उमेदवाराच्या घरी चोरट्याने हातसफाई करत १५ लाखांच्या रोकडसह दागिने लंपास केले़ ही घटना गुरुवारी रात्री घडली़ याप्रकरणी शुक्रवारी शहर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ 
महापालिका निवडणुकीत प्रभाग १४ मधून उमेदवारी करणारे राजेंद्र केकान (रा़ ग़स़ बँक कॉलनी, धुळे)  हे सहकुटुंब गुरुवारी रात्री शिवतिर्थ येथे आमदार अनिल गोटे यांच्या सभेत सहभागी होण्यासाठी गेले होते़ बंद घर असल्याची संधी साधून चोरट्याने केकान यांचे घर फोडले़ चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ सामानाची अस्ताव्यस्त करत कपाटही फोडले़ त्यात ठेवण्यात आलेली १५ लाखांची रोकडसह सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले आहेत़ सभा आटोपल्यानंतर केकान हे आपल्या परिवारासह घरी आले़ त्यावेळी त्यांना आपल्या घरी चोरी झाल्याचे लक्षात आले़ लागलीच केकान यांनी शहर पोलिसांना आपल्या घरात चोरी झाल्याचे कळविले़ घटनास्थळी तातडीने शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते़ याप्रकरणी केकान यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला़ 

Web Title: Theft of the house of the organizer of the folk concourse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे