धुळ्यात आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 11:30 AM2019-07-10T11:30:45+5:302019-07-10T11:32:36+5:30

अनेकांनी साकारल्या संताच्या वेशभूषा

The students did not want to do any work | धुळ्यात आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

धुळ्यात आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या संताच्या वेशभूषाभक्तीमय वातावरणाची निर्मितीग्रामस्थांनी केले पालखीचे पूजन

आॅनलाइन लोकमत
धुळे : आषाढी एकादशीला अद्याप दोन दिवस अगोदरच मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी बालमंदिर व प्राथमिक विद्यामंदिरातर्फे मंगळवारी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या संताच्या वेशभुषेने सर्वांचे लक्ष वेधले होते.
दिंडीच्या सुरवातीला विठ्ठल-रखुमाई यांच्या प्रतिमेचे व ज्ञानेश्वरीचे पूजन संस्थेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, संचालक दगडू देवरे, ताराचंद वाघमारे, भालेराव बोरसे, एस.बी.पाटील, पानगे, साहेबराव रवंदळे, माधव सनेर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विजय ठाकरे, विजू महाराज, दीपक महाराज, गावडे महाराज, प्रकाश रवंदळे, विजय कापडणीस, भैय्या कचवे, राहूल तिखीकर, न्हानभाऊ तिखीकर, भटू चव्हाण, सुरेश जोशी तिखीकर आदी उपस्थित होते.
भक्तिमय वातावरण
यावेळी बालगोपाल व वारकऱ्यांसह गावातून भक्तीमय वातावरणात दिंडी काढण्यात आली. बाल मंदिराच्या व प्राथमिक विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रूख्माई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, अशा विविध संताच्या वेशभूषा केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. याप्रसंगी विठू नामाच्या केलेल्या जयघोषाने परिसर दुमदुमुन गेला होता.
जागोजागी पालखीचे स्वागत
गावकऱ्यांनीही पालखीचे स्वागत करून पूजा केली. यावेळी विद्यार्थी, शिक्षकांनी फुगड्या खेळून पालखी सोहळ्याची शोभा वाढविली होती. विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीमुळे मोहाडी परिसरात भक्तीमय वातावरणाची निर्मिती झाली होती. यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

Web Title: The students did not want to do any work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे