Strains caused by rocky incidents on the second day in Dhule and 8 buses were chopped off | धुळ्यात दुसºया दिवशीही दगडफेकीच्या घटनामुळे तणाव, ८ बसेच्या काचा फोडल्या
धुळ्यात दुसºया दिवशीही दगडफेकीच्या घटनामुळे तणाव, ८ बसेच्या काचा फोडल्या

ठळक मुद्देधुळ्यात बसेसवर दगडफेकीमुळे तणावपुर्ण शांतताभिमा-कोरेगाव घटनांचे उमटताय पडसादबससेवेवर विपरीत परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : सोमवारी रात्री ठिकठिकाणी महामंडळाच्या आठ बसेसवर जमावाकडून दगडफेक झाली़ यात बसेसच्या काचा फुटल्या असल्याने सुमारे ९० हजार ते १ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ भिमा-कोरेगाव परिसरातील घटनांचे पडसाद उमटत असल्याचा अंदाज आहे़ दरम्यान, दगडफेकीमुळे बससेवेवर विपरीत परिणाम होत आहेत़ साक्री रोडवर दुपारी दगडफेकीची घटना घडली आहे़ दुपारी १२ वाजेनंतर साक्री रोडवर भिमनगर आणि कुमार नगर परिसरात दगडफेकीच्या घटनेनंतर तणाव निर्माण झाला़ परिसरातील एका बेकरीच्या काचा फोडल्या़ घटनास्थळी प्रचंड फौजफाटा दाखल झालेला आहे़ परिसर पुर्णपणे बंद झाला आहे़ 
सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. दगडफेकीनंतर जमाव तेथून पसार झाला. घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल झाल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. शहरातील पारोळा रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ रस्त्यावर जळगावकडून येणाºया एम.एच.१४ बीटी३९११ क्रमांकाच्या जळगाव - धुळे बसवर रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास एका जमावाकडून अचानक दगडफेक झाली. दगडफेकीत बसच्या चालक कॅबीनची काच फुटली. बस थांबते तो पर्यंत दगडफेक करणाºयांचा जमाव तेथून पळाला. नगाव बारी परिसरात मुंबई - आग्रारोडवर रात्री साडे आठ ते नऊ वाजेदरम्यान एम.एच.२० बीएल ०९२३ क्रमांकाच्या धुळे - शिंदखेडा बसवर मागून मोटारसायकलवर अचानक पुढे आलेल्या तीन युवकांनी बसवर दगड फेकला. त्यामुळे बसची पुढची काच फुटली. याशिवाय एमएच १४ बीटी १६५१  क्रमांकाची शहादा -धुळे बस, एमएच २० बीएल ०९०८ क्रमांकाची बºहाणपूर-धुळे बस, एमएच १४ बीटी २१३२ क्रमाकाची सुरत-धुळे बस, एमएच १४ बीटी २१३० क्रमांकाची धुळे - न्याहळोद बस, एमएच २० बीएल ०९३७ शिरपूर - अमळनेर बस, एमएच २० बीएल २११४ क्रमांकाची अमळनेर-नवापूर क्रमांकाची बस अशा ८ बसेस फोडण्यात आल्या आहेत़ 


Web Title: Strains caused by rocky incidents on the second day in Dhule and 8 buses were chopped off
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.