धुळ्यात  स्टेशनरोड अतिक्रमणधारकांचा पुनर्वसनासाठी मनपासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 04:20 PM2017-10-30T16:20:48+5:302017-10-30T16:21:47+5:30

 अतिक्रमितांची पर्यायी जागेची मागणी, मनपा देणार घरकुले

Stations in Dhule for the rehabilitation of encroachment holders | धुळ्यात  स्टेशनरोड अतिक्रमणधारकांचा पुनर्वसनासाठी मनपासमोर ठिय्या

धुळ्यात  स्टेशनरोड अतिक्रमणधारकांचा पुनर्वसनासाठी मनपासमोर ठिय्या

googlenewsNext
ठळक मुद्देअतिक्रमणधारकांचा दुपारी १ वाजता मोर्चा मनपावर धडकलामनपा यशवंतनगर, मोहाडीत घरकूले देण्यास तयारमात्र दसेरा मैदान किंवा मनपा शाळा क्र.२९ ची जागा देण्याची अतिक्रमणधारकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील स्टेशनरोडवरील अतिक्रमणधारकांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी सोमवारी महानगरपालिकेत येऊन प्रवेशव्दारासमोरच ठिय्या मांडला़ अखेर आयुक्तांशी झालेल्या चर्चेत पुनर्वसनाबाबत तोडगा न निघाल्याने, त्यांचा ठिय्या कायम होता.
महानगरपालिकेने २६ रोजी रेल्वेस्टेशन रोडवरील अतिक्रमण  जमिनदोस्त केले़ न्यायालयाच्या आदेशाने झालेल्या या कारवाईत २२२ निवासी व २२ व्यावसायिक अतिक्रमणे काढण्यात आली़ त्यानंतर अतिक्रमित कुटूबांना रस्त्यावर राहावे लागत असून त्यांनी पुनर्वसनाची मागणी केली आहे़ दरम्यान, सोमवारी दुपारी १ वाजता स्टेशनरोडवरील अतिक्रमणधारकांचा मोर्चा आनंद बागुल यांच्या नेतृत्वात मनपावर धडकला़ मनपाचे मुख्य प्रवेशव्दार बंद करण्यात आल्याने अतिक्रमणधारकांनी प्रवेशव्दारासमोर ठिय्या मांडला़ अखेर आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी १५ ते २० जणांचे शिष्टमंडळ गेले़ आयुक्तांनी अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन मनपा करणार असून सर्व २२२ अतिक्रमणधारकांची यादी द्यावी, अशी भुमिका मांडली़ यशवंत नगर किंवा मोहाडी येथे घरकुले दिली जातील, असे आश्वासन आयुक्तांनी दिले़ मात्र त्यास अतिक्रमणधारकांनी विरोध केला़ दसेरा मैदान किंवा मनपा शाळा क्रमांक २९ ची जागा देण्यात यावी, घरकुले नको असल्याची भुमिका  अतिक्रमणधारकांनी घेतली़ आयुक्तांशी झालेल्या चर्चेत तोडगा न निघाल्याने अतिक्रमणधारकांनी मनपा प्रवेशव्दारासमोर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले आहे़ 



 

Web Title: Stations in Dhule for the rehabilitation of encroachment holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.