धुळे जिल्ह्यातील १६ गावांची चारा प्रात्याक्षिकांसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 11:24 AM2019-02-06T11:24:03+5:302019-02-06T11:25:21+5:30

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा उपक्रम

Selection for fodder for 16 villages in Dhule district | धुळे जिल्ह्यातील १६ गावांची चारा प्रात्याक्षिकांसाठी निवड

धुळे जिल्ह्यातील १६ गावांची चारा प्रात्याक्षिकांसाठी निवड

Next
ठळक मुद्देचाºयावर करावयाचे प्रात्याक्षिक शेतकºयांना दाखविणार१२ ते २३ फेब्रुवारीपर्यंत उपक्रमशेतकºयांना होणार फायदा


आॅनलाइन लोकमत
धुळे : चारा प्रक्रिया प्रात्याक्षिकांसाठी प्रत्येक तालुक्यातील चार या प्रमाणे १६ गावांची निवड करण्यात आली आहेत. त्या-त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान या तंत्रज्ञान पत्रिकेचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्याहस्ते  करण्यात आले.
जिल्ह्याला काही वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पशुपालकांना चारा टंचाईचाही सामना करावा लागतो. 
सद्यस्थितीत पशुधनाच्या पोषणासाठी मका, ज्वारी, बाजरी इ.पिकांची कुट्टी, कोरडा चारा उपलब्ध आहे. बºयाच प्रमाणात हा प्रक्रियाविरहित निकस चारा जनावराना टाकला जात असतो. अशा चाºयामुळे पशुधनाचे पोषण होत नाही. 
चाºयावर प्रक्रिया करून तो जनावरांना दिल्यास जनावरांचे पोषण उत्तम प्रकारे होऊ शकणार आहे.
शेतकºयांना चाºयावर करावयाची प्रक्रियेसाठी प्रत्याक्षिके दाखविण्यात येणार आहे. यात प्रत्येक तालुक्यातील चार गावांची अशा १६ गावांची निवड करण्यात आलेली आहे. हे प्रात्याक्षिक १२ ते २३ फेब्रुवारीपर्यंत त्या-त्या गावामध्ये होणार आहे. 
दरम्यान चारा प्रक्रियेच्या तंत्रज्ञानाच्या पत्रिकेचे प्रकाशन आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहीते यांच्याहस्ते झाले. 
सीईओंच्या दालनात हा प्रकाशन समारंभ झाला. यावेळी समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., कृषी विकास अधिकारी पी.एम. सोनवणे आदी उपस्थित होते. या प्रसंगी वडजाई येथील शेतकºयांना कीट वाटप करण्यात आले. 


 

Web Title: Selection for fodder for 16 villages in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे