प्रवासात मनोरंजनाची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 07:40 PM2017-09-18T19:40:59+5:302017-09-18T19:42:52+5:30

एस.टी.त बसविली वाय-फाय यंत्रणा,  प्रवाशी घेतात चित्रपट मालिकांचा आनंद

On-the-road experience | प्रवासात मनोरंजनाची अनुभूती

प्रवासात मनोरंजनाची अनुभूती

Next
ठळक मुद्दे प्रवाशी घेतात चित्रपट मालिकांचा आनंदधुळे विभागात ८४४ पैकी ६६७ बसेसमध्ये हे वाय-फाय यंत्र बसविले आहे. मनोरंजनात्मक प्रवास सुखकर झालेला आहे.

प्रवासात मनोरंजनाची अनुभूती
एस.टी.त बसविली वाय-फाय यंत्रणा,  प्रवाशी घेतात चित्रपट मालिकांचा आनंद
आॅनलाईन लोकमत
धुळे : एस.टी.ने लांबपल्याचा प्रवास करायचा म्हटल्यावर अनेकजण नापसंती व्यक्त करतात. कारण त्यांच्यादृष्टीने हा प्रवास कंटाळवाणा असतो. परंतु आता एस.टी.नेही आधुनिकतेची कास धरीत प्रवाशांच्या करमणुकीसाठी  मोफत वाय-फाय सुविधा सुरू करून, प्रवाशांचे मनोरंजन करणे सुरू केले आहे. मनोरंजनात्मक प्रवास सुखकर झालेला आहे.  धुळे विभागात ८४४ पैकी ६६७ बसेसमध्ये हे वाय-फाय यंत्र बसविले आहे. या यंत्राच्या माध्यमातून प्रवाशी मनोरंजनाचा आनंद  घेत आहे. 
एस.टी.ने. प्रवास करणाºयांचा प्रवास मनोरंजनात्मक व्हावा म्हणून जानेवारी २०१७ पासून महामंडळाने आपल्या बसेसमध्ये वाय-फाय सुविधा सुरू केलेली आहे. ही सुविधा यंत्र मिडीया सोलूशन मुंबई यांच्यामार्फत देण्यात येत आहे.
धुळे विभागात मार्च १७ पासून वाय-फाय यंत्र बसविण्यास सुरवात झालेली आहे. या यंत्रात  मराठी, हिंदी, गुजराथी   भाषेचे  जवळपास १० ते १५ चित्रपट डाऊनलोड केलेले आहेत. त्याचबरोबर कॉमेडी एक्स्प्रेससोबतच इतर मराठी मालिकादेखील आहे. केवळ मोठ्यासाठीच नाही तर लहान मुलांचाही विचार करण्यात आलेला आहे. लहान मुलांसाठी  कार्टन्स डाऊनलोड केलेले आहेत. या मनोरंजनामुळे एस.टी.चा प्रवास सुखकर झालेला आहे.   यंत्रात डाऊनलोड केलेले चित्रपट, मालिका, कार्टुन्स हे दीड-ते दोन महिन्यांनी अपडेट करण्यात येतात. जुन्याच्या जागी नवीन  चित्रपट, मालिकां टाकण्यात येतात.
तरूणांकडून सर्वाधिक वापर
ही यंत्रणा नवीन असली तरी याचा वापर तरूणांकडून अधिक होत असल्याचे चित्र आहे. अप-डाऊन करणारे अनेक तरूण अर्ध्या-एक तासाच्या प्रवासात चित्रपट, मालिका पहात असतात. 

आगारनिहाय धुळे विभागात असलेल्या  बसेस. कंसात वाय-फाय यंत्र बसविलेल्या बसेसची संख्या अशी- धुळे १३४ (१२८), साक्री-१०१ (८८), नंदुरबार-१२० (९८), शहादा-११० (६७), शिरपूर-११६ (८८), अक्कलकुवा-७१ (४०), शिंदखेडा-६२ (५५), नवापूर-६९ (५८), दोंडाईचा- ६१ (४५).
डाऊनलोड नाही
वाय-फाय म्हटले म्हणजे अनेकजण आपल्याला पाहिजे ते डाऊनलोड करीत असतात. मात्र एस.टी.मधील वाय-फाय हे फक्त त्यांच्याच यंत्रापुरते मर्यादीत आहे. याच्यामार्फत काहीही डाऊनलोड करता येत नाही. तसेच येथील वाय-फायचा फायदा  व्हाटसअप, युट्युबसाठी करता येत नाही.
प्रवाशांकडून प्रतिसाद : देवरे
प्रवाशांच्या करमणुकीसाठी महामंडळाच्या बसेसमध्ये वाय-फाय यंत्र बसविले आहे. याच्या माध्यमातून प्रवाशांना चित्रपट, मालिका बघता येतात. याला प्रवाशांकडून चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतो आहे. शिवाय महामंडळाच्या योजनांचीही माहिती प्रवाशांना मिळते, अशी माहिती धुळे विभागाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी सांगितले.
 

Web Title: On-the-road experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.