अमळनेर ते फागणे चौफुली रस्ता रूंदीकरणाचे काम वेगात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 02:23 PM2018-11-19T14:23:09+5:302018-11-19T14:24:38+5:30

१४९.७५ कोटीचा निधी मंजूर,  दोन वर्षात पूर्ण होणार रस्त्याचे काम

The road to Amalner to Phagate road is going on fast | अमळनेर ते फागणे चौफुली रस्ता रूंदीकरणाचे काम वेगात सुरू

अमळनेर ते फागणे चौफुली रस्ता रूंदीकरणाचे काम वेगात सुरू

googlenewsNext
ठळक मुद्दे३० किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रूंदीकरणाच्या कामास सुरवात झालेली आहे.या रस्त्यावर असलेले पाईप मोरीचे पुलांचेही रूंदीकरण करण्यात येणार१० वर्षे रस्ता दुरूस्तीची जबाबदारी ठेकेदाराकडेच राहणार आहे. 

आॅनलाइन लोकमत
धुळे : केंद्र शासनाच्या एएनयुटीआय योजनेंतर्गत मेहेरगाव (ता. धुळे) ते अमळनेर या ५३.७४ किलोमीटर अंतराचा रस्ता १० मीटर रूंदीचा होणार असून, त्यासाठी १४९.७५ कोटी रूपये मंजूर झालेले आहेत. दोन वर्षात या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. तूर्त अमळनेर ते फागणे चौफुली (ता.धुळे) दरम्यान रस्ता रूंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे.
केंद्र शासनाने प्रथमच एएनयुटीआय ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत  एनएसके ५८ हा मेहेरगाव ते धुळे, फागणे ते नवलनगर, अजंग ते नवलनगर व नवलनगर ते अमळनेर असा रस्ता तयार करण्यात येत आहे. 
आॅगस्ट २०१८ पासून फागणे ते अमळनेर दरम्यानच्या ३० किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रूंदीकरणाच्या कामास सुरवात झालेली आहे.हे काम वेगात सुरू आहे. 
गावाच्या ठिकाणी कॉँक्रीटकरण
या रस्त्यांतर्गत असलेल्या गावाच्या ठिंकाणी रस्त्याचे कॉँक्रीटीकरण करण्यात येणार असून, रस्त्याच्या दोन्ही बाजुला गटारीही बांधण्यात येणार आहे. गाव वगळता उर्वरित रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील १० वर्षे रस्ता दुरूस्तीची जबाबदारी ठेकेदाराकडेच राहणार आहे. 
रस्ता सलग तयार करणार
पूर्वी टप्या-टप्यात रस्त्याचे काम करण्यात येत होते. मात्र केंद्र शासनाच्या या नवीन योजनेमुळे एकच ठेकेदार हे काम करणार आहे. 
या रस्त्यावर असलेले पाईप मोरीचे पुलांचेही रूंदीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एजाज शाह यांनी दिली. 
 रस्ता रूंदीकरणाच्या मार्गात अडथळे ठरणारे झाडे तोडण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. येत्या दोन वर्षात रूंदीकरणाचे काम पूर्ण होईल.

Web Title: The road to Amalner to Phagate road is going on fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे