उध्दरली कोटी कुळे,भीमा तुझ्या जन्मामुळे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 04:51 PM2019-04-15T16:51:41+5:302019-04-15T16:52:44+5:30

डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती : शहरात रॅलीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम 

Raised millions of families, Bhima due to your birth! | उध्दरली कोटी कुळे,भीमा तुझ्या जन्मामुळे !

dhule

Next

धुळे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती रविवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  जेलरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अधिकारी, पदाधिकाºयांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
सामूहिक बुद्धवंदना
रविवारी सकाळी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदनेचा कार्यक्रम झाला. यावेळी वाल्मिक दामोदर, एम़ जी़ धिवरे, सागर कांबळे, अशोक सुडके, भिवसन आहिरे, पुरूषोत्तम गरूळ, विलास करंडक, विमल बेडसे, मिना बैसाणे, अनिता साळवे, किरण जोंधळे, संजय जवराज, दिनेश महाले, प्रा़विलास चव्हाण, गणेश मोरे, बाबा गलाणी, अ‍ॅड़ गोपीसागर धिवरे, अ‍ॅड़मधुकर भिसे, अ‍ॅड़महेंद्र निळे, अ‍ॅड़ उमेश सुर्यवंशी हरिचंद्र लोंढे कुंदण खरात युवराज मोहिते, शंकर थोरात, अनिल दामोदर, सिध्दार्थ पारेराव, भिवसन आहिरे आदी संख्येने उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी कार्यालय  
सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम झाला. यावेळी उपजिल्हाधिकारी गोंविद दाणेज, प्रमोद भामरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, नगररचना संग्रमा कानडे  उपस्थित होते़ 
पुतळा परिसरात  रोषणाई
जयंतीनिमित्त शहरात विविध चौकांमध्ये दोन दिवस अगोदरपासून रोषणाई  करण्यात आलेली होतीे.   शहरात प्रमुख चौकांमध्ये डॉ.आंबेडकरांना अभिवादनाचे मोठ मोठे बॅनर  लावण्यात आले होते. 
मिरवणुकीने  लक्ष वेधले
शहराच्या विविध भागातून सकाळी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.  सायंकाळी शहरातील विविध भागातून मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुका    रात्री उशिरापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या परिसरात पोहचतील.  
मिरवणुकींमध्ये डीजेवर वाजविण्यात येणाºया  भीमगीतांच्या तालावर अनुयायी धुंद होवून नाचत होते. यात तरुण-तरुणींसह, महिला व पुरुषांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.  
मोफत कॉपी वाटप 
शहरातील कमलाकर सांस्कृतिक मंडळातर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील आंबेडकरी अनुयायांसाठी मोफत कॉपी वाटप करण्यात आली होती़  या कार्यक्रमास दिलीप साळवे, शोभा चव्हाण, मधु चव्हाण, आबा खंडारे,संजय बैसाणे, शशिकांत वाघ, संजय पगारे  उपस्थित होते़   

Web Title: Raised millions of families, Bhima due to your birth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे