राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेत ‘रेनबोवाला’ ने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 05:52 PM2019-02-18T17:52:49+5:302019-02-18T17:56:11+5:30

सूर्यकांता करंडक राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा : ‘अशांतीपर्व’ द्वितीय तर ‘कॅलीडोस्कोप’ तृतीय

'Rainbowla' has won the state-level open singles competition | राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेत ‘रेनबोवाला’ ने मारली बाजी

राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेत ‘रेनबोवाला’ ने मारली बाजी

Next
ठळक मुद्देस्पर्धेत १७ संघाचा सहभागस्पर्धेचे चौथे वर्षप्रथम तीन विजेत्या संघांना अनुक्रमे २१ हजार १५ हजार व ११ हजार रूपयांचे रोख पारितोषिक

आॅनलाइन लोकमत
धुळे : सूर्यकांता करंडक राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धेत गंधर्व कलाधार निर्मित टिटवाळा (मुंबई) ‘रेंनबोवाला’ या एकांकिने प्रथम क्रमांक मिळविला. तर अभिनय संस्था कल्याणच्या ‘अशांती पर्व’ने द्वितीय व चौकट क्रिएशन निर्मित रत्नागिरीच्या ‘कॅलीडोस्कोप’ने तृतीय क्रमांक मिळविला़
रोटरी क्लब आॅफ धुळे विद्यानगरीतर्फे स्व.डॉ. सूर्यकांता अजमेरा यांच्या स्मरणार्थ ‘सूर्यकांता करंडक’ राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे चौथे पर्व होते. स्पर्धेत १७ संघ सहभागी झाले होते.
शहरातील हिरे भवन येथे रविवारी रात्री आयोजित पारितोषिक वितरण समारंभासाठी ‘फुलता कळी फुलेना’ या मालिकेतील अभिनेत्री मयूरी देशमुख यांच्याहस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर अतुल अजमेरा, रेणू अजमेरा, रोटरी क्लब आॅफ धुळे विद्यानगरीचे अध्यक्ष वैभव जगताप, सेक्रेटरी भूषण माळी होते.
वैयक्तिक बक्षिसांमध्ये पार्श्वसंगीत प्रथम विशाल माने (रेनबोवाला), द्वितीय अभिजित कबाडे (नेकी). प्रकाश योजना- प्रथम यश नवाले (रेनबोवाला), द्वितीय राजेश शिंदे (सरफिऱ्या). रंगभूषा प्रथम अशांतीपर्व, द्वितीय सरफिºया. नेपथ्य प्रथम दिगदेव (रेनबोवाला), द्वितीय नवनीत राजूरकर (कॅलीडोस्कोप). दिग्दर्शक प्रथम हर्षल व राकेश (रेनबोवाला), द्वितीय अभिजित झुंझारराव (अशांतीपर्व), अभिनय पुरूष- प्रथम केदार देसाई (सरफिºया), द्वितीय स्वप्नील टकले (रेनबोवाला). अभिनय स्त्री - प्रथम सायली बांदकर (रेनबोवाला), द्वितीय सोनाली मगर (अशांतीपर्व) यांचा समावेश आहे.
परीक्षक म्हणून मयूर खांडगे, अश्विनी शेंडे, आनंद प्रभू यांनी काम पाहिले.
एकांकिका स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार व ११ हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तर वैयक्तिक बक्षीसांमध्येही रोख रख्कम व प्रमाणपत्र देण्यात आले.

 

Web Title: 'Rainbowla' has won the state-level open singles competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.