विविध क्षेत्रातील गुणवंताचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:31 AM2019-07-22T11:31:29+5:302019-07-22T11:32:05+5:30

जिल्हा सुचिकृत बँक कर्मचारी पतसंस्था : उपक्रमाला मिळाला प्रतिसाद

Quality of merit in different fields | विविध क्षेत्रातील गुणवंताचा गौरव

शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव प्रसंगी गुणवंतांसह विद्यार्थी, मान्यवर व पदाधिकारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुळे - नंदुरबार जिल्हा सूचीकृत बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे पारितोषिक वितरण समारंभ व रक्तदान शिबिर बाळकृष्ण मंगल कार्यालयात पार पडले़ 
अध्यक्षस्थानी   माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रा. संजय पाटील उपस्थित होते़  निवृत्त संचालक, गुणवंत विद्यार्थी़, पदोन्नती झालेले सभासद यांच्यासह सामाजिक, क्रीडा, व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया डॉ. जगदीश गिंदोडिया, प्रा. अशोक शेळके, गोपाल गुजराथी, प्राजक्ता शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गुणगौरव व पारितोषिक कार्यक्रमाप्रसंगी चेअरमन लक्ष्मीकांत जोशी, व्हा.चेअरमन नीता चौधरी, सेके्रटरी लक्ष्मण नागरे, ईश्वरलाल चौधरी, संजयसिंह गिरासे, राजेंद्र चव्हाण, हेमंत कुलकर्णी, लोटन जाधव, बळवंत बैसाणे, प्रभाकर देवरे, संध्या आचवल  सर्व संचालक मंडळ व सभासद सदस्य उपस्थित होते.    सुत्रसंचालन संजयसिंह  गिरासे, निता चौधरी, लोटन जाधव यांनी केले़ हेमंतकुमार कुलकर्णी यांनी आभार मानले़ 
या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सकाळी रक्तदान शिबिराचे  देखील आयोजन करण्यात आले़ यात महिला तरूण, तरूणींनी विशेष सहभाग घेतला यात जवळपास ५३ जणांनी रक्तदान केले.

Web Title: Quality of merit in different fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे