धुळे जिल्हयासाठी पाच नवीन  प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:09 PM2018-07-09T12:09:04+5:302018-07-09T12:10:31+5:30

शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा, ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा मिळणार

Proposal of five new Primary Health Centers for Dhule District | धुळे जिल्हयासाठी पाच नवीन  प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव

धुळे जिल्हयासाठी पाच नवीन  प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात सद्यस्थितीत ४१ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत.नव्याने पाच प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा प्रस्तावग्रामीण भागात आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळणार

आॅनलाइन लोकमत
धुळे : ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात  म्हणून जिल्ह्यात पाच नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. 
ग्रामीण भागात चांगली सुविधा आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांच्या मार्फत पुरविली जाते. मात्र जिल्ह्यात आदिवासीबहुल क्षेत्र जास्त आहे. त्याचबरोबर काही गावांची लोकसंख्याही जास्त आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वच नागरिकांनी आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाव्यात या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत पाच नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आलेला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तेथे आरोग्य केंद्र सुरू करण्यात येईल. सध्या जिल्ह्यात ४१ आरोग्य केंद्र व २६३ उपकेंद्र आहेत. 
जिल्ह्यातील वरूड, मांजरोद (ता. शिंदखेडा), गिधाडे (ता. शिंदखेडा), घोडदे, शेवाळी (ता. साक्री) या पाच ठिकाणी नवीन आरोग्य केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे.प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या ठिकाणी दोन डॉक्टर, एक विभागप्रमुख व एक सहायक मेडीकल आॅफीसर यांची नियुक्ती केली जाणार आहे.


 

Web Title: Proposal of five new Primary Health Centers for Dhule District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे