धुळे : येथील एकवीरा शाळेचे शिक्षक बाळू भाऊराव पाटील यांचे वेतन थकल्याप्रकरणी न्यायालयाने शाळा संचालकाच्या मालमत्ता जप्तीचे आदेश दिल़े त्यानुसार पथक कारवाईसाठी गेले असता संचालकाने 25 हजार रुपयांचा धनादेश अदा केल्याने कारवाई टळली़
येथील एकवीरादेवी शाळेचे शिक्षक बाळू भाऊराव पाटील यांनी थकीत वेतनप्रश्नी नाशिक येथील शाळा न्यायाधिकरणात धाव घेतली होती़ न्यायाधिकरणाने शिक्षकाच्या बाजूने निर्णय दिला़ सदर निर्णयाला आव्हान देत शाळेच्या संचालकाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती़ परंतु उच्च न्यायालयाने शाळा न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवला़ त्यानंतर शिक्षक बाळू पाटील यांनी रक्कम वसुलीसाठी धुळे न्यायालयात दरखास्त दाखल केली होती़ न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालय लिपिक, शिक्षक व पोलीस हे दुपारी संचालकाच्या घरी जप्तीसाठी गेले असता संचालकाने 25 हजाराचा धनादेश दिला तसेच उर्वरित रक्कम भरण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे जप्तीची कारवाई टळली़ शिक्षक बाळू पाटील यांच्यातर्फे अॅड़ कुंदन पवार यांनी काम पाहिल़े