पोलिसांची ‘एकतर्फी’ भूमिका़ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:06 AM2019-05-25T11:06:06+5:302019-05-25T11:06:59+5:30

निवेदन : गृहराज्यमंत्र्यांना जिल्हा शिवसेनेचे साकडे, वेधले लक्ष

Police 'unilaterally' role! | पोलिसांची ‘एकतर्फी’ भूमिका़ !

जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विरोधात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन सादर करताना डावीकडून नरेंद्र परदेशी, अ‍ॅड़ पंकज गोरे, गुलाब माळी, हिलाल माळी, अतुल सोनवणे, प्रा़ शरद पाटील़ 

Next


धुळे : पोलिसांकडून कारवाई करत असताना एकतर्फी केली जात असून ती चुकीची आहे़ पूर्ववैमनस्यातून जिवघेणा हल्ला करणाºया पिता-पुत्राला जामीन मंजूर करुन देण्यात आला़ याप्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हा शिवसेनेच्यावतीने गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़ 
एका हळदीच्या कार्यक्रमाला भेट देवून घरी जात असताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांच्यावर महापौर चंद्रकांत सोनार, देवेंद्र सोनार, भूषण सोनार व त्यांच्या समर्थकांनी जीवघेणा हल्ला केला़ त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात ३९५, ३९७ कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला़ त्यानंतर संबंधितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, त्यांना अटक करावी यासाठी मोर्चा काढण्यात आला़ यानंतर दबावाखाली आरोपींची पार्श्वभूमी न पाहता महापौर पिता-पुत्रांवर दाखल गुन्ह्यातील कलम रद्द करण्यात आले़ या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी हिलाल माळी, प्रा़ शरद पाटील, अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी आदींनी केली आहे़ 

 

Web Title: Police 'unilaterally' role!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे