धुळ्यात गावठी पिस्तुल लावून चाकूने एकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 05:11 PM2019-02-07T17:11:48+5:302019-02-07T17:12:31+5:30

देवपुरातील घटनेने तणाव : सोन्याची चैन हिसकाविली

Pistol with a pistol, attacked one by knife | धुळ्यात गावठी पिस्तुल लावून चाकूने एकावर हल्ला

धुळ्यात गावठी पिस्तुल लावून चाकूने एकावर हल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मागील भांडणाची कुरापत काढून चार ते पाच जणांनी एकाच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावली तर इतरांनी चाकूने वार केल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली़ याप्रकरणी रात्री ११ वाजेच्या सुमारास देवपुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ 
याप्रकरणी अजय अमृत कांबळे (रा़ नेहरु नगर, मास्तरवाडी, देवपूर, धुळे) या २५ वर्षीय तरुणाने फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, गेल्या दिड महिन्यांपुर्वी झालेल्या वादाचे पडसाद बुधवारी उमटले़ देवपुरातील बसस्टँडसमोर बोअरींगच्या दुकानासमोर बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला़ वादाचे पडसाद हाणामारीत झाल्यानंतर एकाने गावठी पिस्तूल काढून अजय कांबळे या तरुणाच्या डोक्यावर लावत जीव घेण्याची धमकी दिली़ तर अन्य चार ते पाच जणांनी कांबळे याच्या पाठीवर चाकूने सपासप वार केल्याने यात गंभीर दुखापत झाली़ याशिवाय हाणामारीत त्याच्या गळ्यातील एक तोळे वजनाची १० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून घेत मारेकºयांनी पोबारा केला़ घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस दाखल झाले होते़ 
ही घटना बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास झाली़ यामुळे देवपूर बसस्थानकाच्या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ या घटनेनंतर कांबळे याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अजय अमृत कांबळे याने फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, अनिल बडगुजर (पुर्ण नाव माहित नाही) आणि त्याच्यासोबत असलेले ४ अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात संशयावरुन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे घटनेचा तपास करीत आहेत़ 

Web Title: Pistol with a pistol, attacked one by knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.