नृत्याविष्कारातून संस्कृतीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:00 PM2019-03-19T23:00:09+5:302019-03-19T23:00:29+5:30

सुळेत ‘भोंगºया’ बाजाराचा जल्लोष  :  बाजार गर्दीने फुलला, लाखो रूपयांची उलाढाल

The philosophy of culture through dance-drama | नृत्याविष्कारातून संस्कृतीचे दर्शन

नृत्याविष्कारातून संस्कृतीचे दर्शन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : आदिवासी बांधवासाठी पर्वणी असलेल्या तालुक्यातील सुळे येथे भोंगºया बाजाराला उत्साहात सुरूवात झाली़ लोकगीत गायन, बासरी  व ढोलच्या आवाजात नृत्य करीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दृष्काळाचे सावट जाणवत असले तरी या बाजारात १२-१५ लाखाहून अधिक उलाढाल झाली.  
१९ रोजी मंगळवारी सुळे गावाचा आठवडा बाजाराचा दिवस होता.  याशिवाय मध्यप्रदेशातील रोसर, पलसुद, नागलवाडी, मंडवाडा, चाचरीया व बाबदड येथेही भोंगºया उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला़ यानिमित्ताने आदिवासी पाड्यांमधून आलेल्या उत्सवप्रिय आदिवासी युवक-युवतींनी बाजारात चांगलीच धमाल केली. उत्सवप्रिय आदिवासी युवक-युवतींसाठी हा बाजार म्हणजे आनंद द्विगुणित करून व्यक्त करण्याचे मोठे ठिकाण आहे. तरूणांमधील सळसळता उत्साह आणि आदिवासी संस्कृतीचे आगळेवेगळे दर्शन घडविणाºया येथील भोंगºया बाजारात यंदा परिसरातील हजारो आदिवासी बांधवांनी हजेरी लावली होती. 
भोंगºया बाजारात आपापली दुकाने थाटण्यासाठी निरनिराळ्या व्यावसायिकांनी रस्त्याच्या दुतर्फा तात्पुरत्या दुकानासाठी जागा उपलब्ध करून घेतल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फावर विविध विके्रत्यांनी दुकाने थाटली होती. भोंगºया बाजाराच्या दिवशी गावातील वातावरण उत्साही दिसून येत होते. 
सकाळपासूनच  सांगवी गावाजवळील जोयदा, खैरकुटी, पनाखेड, झेडेअंजन, खंबाळे, चौंदी, रोहिणी, खाºया, दोंदवाडी आदी गावांमधील आदिवासी युवक-युवती विविध वेशभूषा करून आले होते. आदिवासी बांधवांनी सजविलेल्या बैलगाडीतून तर काही मिळेल त्या वाहनातून बाजाराला आले होते. गावाजवळच्या पाड्यांतून येणाºया आदिवासी बांधवांनी मोठ्या आकाराचा ढोल, तीरकामठा, कास्याची गिरमी, बासरी आदी साहित्य सोबत आणले होते. दुपारनंतर बाजारात गर्दी उसळली होती. तरूण-तरूणींनी खास आदिवासी पोशाख, काहींनी कमरेभोतवी आकर्षक शाली गुंडाळल्या होत्या. 
डोंगरदºयांमध्ये राहणाºया आदिवासींच्या डोक्यावर असलेल्या टोप्यांवर निरनिराळे प्राणी-पक्षांचे चित्र होती. पारंपारिक आदिवासी गितांसह काही हिंदी चित्रपटांच्या गितांचा सुरही आपल्या बासरीतून वाजवित होते. अनेक आदिवासी बांधव गटा-गटाने नृत्य करून आनंद लुटला. बाजारामुळे रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली होती. 
भोंगºया बाजार पहाण्यासाठी खास बाहेरगावांहून आदिवासी बांधवांनी हजेरी लावली होती. आदिवासी महिला व तरूणींनी वस्त्रालंकार तसेच गृहोपयोगी वस्तूंंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली़
मेलादा उत्सवाच्या तयारीला लागलेत ़़़
होळीच्या दुसºया दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी मेलादा म्हणजे मेळावा भरविला जातो. या मेळाव्यात अग्नि विस्तवावर काही लोक अनवाणी चालतात हे पाहण्यासाठी खूपच गर्दी झालेली असते. पावरा लोक अशारितीने आपले सर्वच सण त्यातल्या त्यात होळी हा सण महत्वाचे समजतात. आणि उत्साहाने व पारंपारिक पध्दतीने आजही साजरा करतात. त्यातूनच त्यांनी आपल्या आदिवासी संस्कृतीची जोपासना केली आहे. होळीच्या पाचव्या दिवसापासून फाग गोळा करण्यासाठी पावरा जमातीतील पुरूष फिरतात. एकत्रितरित्या हा कार्यक्रम होतो. भोंगºया उत्सव आता संपण्याच्या मार्गावर असतांना आता मेलादा उत्सवाच्या तयारीला तरूणाई लागलेली दिसते़
आज भोंगºया बाजाराचा समारोप ़़़
आदिवासी बांधवाचा अप्रतिम असलेला भोंगºया उत्सवाला सुरूवात झाली आहे़ आज २० ला दहिवद, पनाखेड, कोडीद, सिलावद, बालसमुद, घट्या, धनोरा, भवती, सेमलेट, धवळी येथे भोंगºया बाजाराचा समारोप केला जाणार आहे. 
होळी नंतर येणारा व आदिवासी बांधवाचा सण असलेला मेलादा वा मेवादे म्हणजे विधीवत पूजा करून विस्तवावर चालून साजरा होणारा सणाची सांगता होय. २० ला चोंदी, २१ ला दुरबुड्या, पळासनेर तर २२ ला शेमल्या येथे हा सण पारंपारिक पध्दतीने साजरा केला जातो.
हातात घुंगरू धरून आदिवासी तरुणांनी नृत्याविष्कार सादर करत सर्वांना थक्क करून सोडले. 
आदिवासी बांधवांसाठी या ठिकाणी ग्रामपंचायत व सेवाभावी संस्थांतर्फे पाणपोईची व्यवस्था करण्यात आली होती. 
होळी उत्सव हा आदिवासी पावरांचा हिंदूच्या दिवाळी सणा इतकाच महत्वाचा असल्यामुळे मोठ्या उत्सवात आनंद घेवून आदिवासी बांधव जल्लोष साजरा करतात़

Web Title: The philosophy of culture through dance-drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे