लाइव न्यूज़
 • 10:41 AM

  साखरेचे दर 600 रूपयांनी कोसळले. हंगाम सुरू होताच दर कोसळले. एफआरपीपेक्षा जास्त दर देण्यास कारखान्यांचा नकार.

 • 10:40 AM

  ठाणे- घोडबंदर रोडवर अपघात. एकाचा मृत्यू, तीन जण जखमी.

 • 10:20 AM

  पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी होणार, येत्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता - सूत्र

 • 10:11 AM

  पुणे : सावित्रीबाई पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत विद्यापीठ शिक्षक गटातून डॉ. संजय ढोले, डॉ. मनोहर जाधव, ज्योती भाकरे विजयी. प्राचार्य गट, महाविद्यालय अध्यापक गट, विद्यापरिषद व अभ्यास मंडाळची मतमोजणी सुरु.

 • 10:10 AM

  चंद्रपुरातील जंगलात वाघ मृतावस्थेत आढळला. वाघाच्या झुंजीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल जंगलातील घटना.

 • 10:08 AM

  कोल्हापूर : चंद्रकांत पाटील यांच्या कर्नाटकातील वक्तव्याचा सीमाभागातील कार्यकर्त्यांकडून निषेध. संभाजीनगर परिसरात असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी मोर्चा.

 • 09:49 AM

  मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची प्रकृती गंभीर.

 • 09:29 AM

  मुंबई शेअर बाजारात निफ्टीची विक्रमी उसळी, पहिल्यादांच 11 हजार अंकांचा टप्पा गाठला.

 • 09:09 AM

  बेळगाव : चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी बेळगावहून कोल्हापूरला कार्यकर्ते रवाना.

 • 08:56 AM

  सरकारला निधी उपलब्ध करुन देणा-या विधेयकावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली, 69 तासांपासून सुरु असलेले शट डाऊन संपवले.

 • 08:54 AM

  तो दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय नव्हता, जे यंत्रणेला सांगायचेय तेच ते सांगतायत - दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशीच्या वडिलांची प्रतिक्रिया.

 • 08:45 AM

  कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पुसामा यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित महापौर बाल चित्रकला स्पर्धाला सुरूवात. स्पर्धात 5 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग.

 • 08:24 AM

  विरार : अमित झा आत्महत्या प्रकरण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्यावर गुन्हा, आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप. युनूस शेख यांच्यासहीत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल.

 • 06:58 AM

  औरंगाबाद: एमआयडीसी वाळूज पोलिसांची कुंटणखान्यावर धाड, तीन मुलींची सुटका , रात्री उशीरा केली कारवाई.

 • 12:57 AM

  वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम : दावोस येथे पंतप्रधान मोदींनी घेतली स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपतींची भेट, ट्विट करून दिली माहिती.

All post in लाइव न्यूज़