जुनी पेंशन योजनेसाठी धुळ्यात शिक्षकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 04:38 PM2018-02-17T16:38:22+5:302018-02-17T16:41:29+5:30
निवासी उपजिल्हाधिकाºयांना दिले निवेदन, अनेक शिक्षकांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जुनी पेंशन योजना लागू करावी व सातवा वेतन आयोग लागू करावा या मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषद( प्राथमिक विभाग) यांच्यातर्फे आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांना देण्यात आले.
नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व शिक्षक व सर्व अधिकारी, कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी हे आंदोलन होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘एकच मिशन, जुनी पेंशन’,‘सातवा वेतन आयोग लागू झालाच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. सुमारे दोन तास हे धरणे आंदोलन सुरू होते.
मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नांद्रे, जिल्हा सरचिटणीस गणेश वाघ, कार्याध्यक्ष रामभाऊ पाटील, कोषाध्यक्ष कैलास मेहता, गिरीश बागूल, विनोद भामरे, जयसिंग घुरटे, जगदीश पाटील, उमाकांत नांद्रे, अनिल गांगुर्डे, प्रकाश गावीत, संभाजी आंधळे, सत्यवान शिरसाठ, रूपेश जैन, सुनील खैरनार, अनिस शहा, बापू अखडमल, दीपक पाटील, महेश मुळे, नितीन ठाकूर, यांच्यासह सुमारे २०० शिक्षक उपस्थित होते.