नेर येथे सर्वाधिक १०९ मि.मी़ पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 03:08 PM2017-08-21T15:08:23+5:302017-08-21T15:09:28+5:30

अतिवृष्टीचा इशारा : जिल्ह्यात नेर व शेवाडे गावात अतिवृष्टी

Ner in dhule maximum 10 9 mm rain | नेर येथे सर्वाधिक १०९ मि.मी़ पाऊस

नेर येथे सर्वाधिक १०९ मि.मी़ पाऊस

googlenewsNext
ठळक मुद्देयेत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा.नागरिकांनी महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर निघू नये, तसेच कुठल्याही झाडाखाली थांबू नये,खोटी माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये.गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, तरूण मंडळी, ग्रामरक्षक दलाचे सदस्य यांनी गावातील परिस्थिती वर लक्ष ठेवावे, तलाठी, ग्रामसेवक , विद्युत वितरण कर्मचारी यांनी मुख्यालयी संपर्क ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यात गेल्या २४ तासात सर्वाधिक पाऊस नेर परिसरात १०९ मिमी झालाय, त्या खालोखाल शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथे ८५ मिमी, शिरपूर तालुक्यात ७७ मिमी ंआणि साक्री तालुक्यात ६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. प्रशासनाने येत्या २४ तासात अतिवृष्टीची शक्यता असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, सोमवारी ढगाळ वातावरण कायम असले तरी पाऊस मात्र थांबला आहे.
जिल्ह्यात २४ तासात सरासरी ५९.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात धुळे तालुक्यात ३५ मि.मी., साक्री तालुका ६२, शिंदखेडा तालुका ६४ आणि सर्वाधिक शिरपूर तालुक्यात ७७ मि.मी. पावसाची नोंद झाली.
नेर व शेवाडेला अतिवृष्टी
धुळे तालुक्यातील नेर येथे सर्वाधिक १०८ मि.मी. तर साक्री तालुक्यातील शेवाडे येथे ८५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 
धुळे तालुक्यातील नेर येथे रविवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. सोमवारी पहाटे दोन वाजेपर्यंत संततधार पाऊस सुरु होता. यामुळे परिसरातील शेतामध्ये पाणी साचले आहे. नेर येथील महादू शामजी सैंदाणे या शेतकºयाच्या शेतात तर पाण्याचे तळे साचले आहे. शेतकरी हिरामण रतन खलाणे या शेतकºयाच्या शेतातील चाºयाचे पिक अतिवृष्टी आणि वादळी वाºयामुळे आडवे पडले आहे. 
रविवारी दिवसभर थांबून थांबून पाऊस सुरु होता. सायंकाळी पाच ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत चांगला पाऊस झाला. मात्र सोमवारी पहाटेपासून पाऊस थांबला आहे. 

Web Title: Ner in dhule maximum 10 9 mm rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.