मध्यवस्तीतील पार्किंगच्या अडचणीत आता ‘जाळ्यां’ची सर्वाधिक भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:08 PM2019-04-25T23:08:45+5:302019-04-25T23:09:05+5:30

आग्रा रोडवरील स्थिती : सर्वसामान्य वाहनधारकांसह व्यापाºयांनाही नाहक सहन करावा लागतो त्रास

Most of the 'netting' now in the middle of a parking lot is in the parking lot | मध्यवस्तीतील पार्किंगच्या अडचणीत आता ‘जाळ्यां’ची सर्वाधिक भर

मध्यवस्तीतील पार्किंगच्या अडचणीत आता ‘जाळ्यां’ची सर्वाधिक भर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : इथे आपले वाहन लावू नका, दिसत नाही का जाळी टाकलीय, तुमचे वाहन पुढे लावा असे एक ना अनेक अनुभवांना सर्व सामान्य नागरीकांना सामोरे जावे लागत आहे़ ग्राहकांना दुकानांमध्ये जाण्यासाठी मार्ग मिळावा याकरीता दुकानदारांकडून रस्त्यावर जाळ्या टाकल्या जात आहेत़ परिणामी वाहनचालकांची अडचण होत आहे़ याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे़ 
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला आग्रा रोडवर मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची खरेदीसाठी ये-जा सुरु असते़ या नागरीकांना नेहमीच वाहतुक कोंडीसह पार्किंगचा प्रश्न सतत भेडसावत असतो़ मध्यवर्ती  पेठांमध्येच शहरातील मुख्य बाजारपेठ असल्याने मुळातच अरुंद आणि निमुळत्या रस्त्यांवर वाहने अस्ताव्यस्त लावल्याने वाहतुकीची कोंडी होत असते़ त्यातच दुकानदार दुकानांसमोर लोखंडी जाळ्या टाकन ठेवतात़ 
मुळातच या भागात पार्किंगचा प्रश्न बिकट बनलेला आहे़ दुचाकीचालकांना वाहने लावायला जागा मिळत नाही़ बरेच लांबवर आपले वाहन लावून खरेदीसाठी फिरावे लागते़ दुकानदारांकडून रस्त्यावर टाकण्यात येत असलेल्या जाळ्यांच्या जागेवर दुचाकी लावण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकते़ मात्र, काही दुकानदारांची अरेरावी सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत आहे़ त्यातल्या त्यात ज्येष्ठ नागरीकांना तर त्यांची वाहने लावायची कुठे? असा प्रश्न पडतो़ त्यांना फार लांबवर चालणेही शक्य होत नाही़ वास्तविक वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याचा हा प्रकार आहे़ हा देखील एक प्रकारे अतिक्रमणाचा मुद्दा आहे़ हा गंभीर असा मुद्दा आहे़ महापालिका प्रशासनाने यावर योग्य तो निर्णय घेऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे़ असे झाल्यास उदभवणारे वाद थांबविता येऊ शकतील़ 
प्रशासनाचे दुर्लक्ष कशासाठी?
वाहतूक पोलिसांनी बºयाच रस्त्यांवर पार्किंगबाबत धोरण आखले आहे़ महापालिकेकडून पार्किंग पट्टे मारण्यात आलेले आहेत़ मात्र, नागरिक कधी-कधी या पट्ट्याच्या बाहेर आपली वाहने उभी करतात़ हे देखील चुकीचे असून त्यामुळे बºयाचदा त्यांचीच अडचण होते. दुकानदारांकडून जाळ्या टाकताना आमच्या दुकानात येण्यासाठी रस्ताच नाही़ तेथे जाळी ठेवली नाही तर ग्राहकांना लांबून वळसा घालून यावे लागते़ दुकानाबाहेर जाळी टाकल्याने परिणामी त्यांची गैरसोय यामुळे दूर होते, अशी कारणे दुकानदारांकडून देण्यात येत आहेत़ याअनुषंगाने आता महापालिका प्रशासनाकडून नेमके कोणते धोरण आखले जाते,  याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे़ 

Web Title: Most of the 'netting' now in the middle of a parking lot is in the parking lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे