वृध्दासह महिलांना गंडा घालणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:46 AM2018-02-23T11:46:45+5:302018-02-23T11:47:16+5:30

संशयित पालघरचा : शहर पोलिसांची कामगिरी

Martingale for the women with the old man | वृध्दासह महिलांना गंडा घालणारा जेरबंद

वृध्दासह महिलांना गंडा घालणारा जेरबंद

Next
ठळक मुद्देधुळे शहर पोलिसांची कामगिरीदिशाभूल करणारा गजाआडसामान्य नागरिकांना सावधानतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अज्ञानाचा गैरफायदा घेत व खोटी सहानुभूती दाखवत वृध्दांसह महिलांची दिशाभूल करणाºया पालघर (मुंबई) येथील निवृत्ती एकनाथ जाधव (४५) याला शहर पोलिसांच्या पथकाने संशयावरुन गुरुवारी अटक केली़ दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते़ 
शहरातील गल्ली नंबर ५ मधील एका बँकेच्या बाहेर असलेल्या एटीएम मशिनजवळ गेल्या काही दिवसांपासून उभा राहून वृध्द महिलांना पैसे काढण्यासाठी तो मदत करत होता़ त्याने या माध्यमातून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला़ मदतीच्या बहाण्याने तो अज्ञानाचा गैरफायदा घेत एटीएमधारकांना लुबाडत होता. जेवढी रक्कम काढायला संबंधित सांगायचे तो तेवढी रक्कम काढून हातचलाखी करत त्यातून एक हजार रुपये सहजपणे काढून घ्यायचा़ त्याने ही बाब कोणाच्याही लक्षात येऊ दिली नव्हती़ विशेष म्हणजे आज एवढेच पैसे निघत असल्याचे खोटे सांगून तो नागरिकांची दिशाभूल करत होता़ 
तसेच त्याने पैशांच्या आकाराचे बंडल तयार करुन आपल्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जमा करुन द्या़ मला पैशांची गरज नाही़ ज्यावेळेस लागतील त्यावेळेस आपल्या एटीएमने काढले जातील, असे सांगून त्याने पैशांची हेराफेरी केली़ ही बाब पोलिसांच्या पथकाला समजल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले़ 

Web Title: Martingale for the women with the old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.