ठळक मुद्देलळींग कुरणातील जवाहर गेट समोर आढळला बिबट्याचा मृतदेह़साक्री पश्चिम पट्यातून लळींग कुरणात मे महिन्यात सोडले होते बिबट्याला़ वन विभागाकडून पंचनामा करण्याच्या कामाला सुरुवात़

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरानजिक लळींग कुरणातून बाहेर आलेला बिबट्याला ट्रकची जोरदार धडक बसली़ यात त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना लळींगजवळ असलेल्या जवाहर गेट समोर मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली़ मृत बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली़ माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली़ 
साकी तालुक्यातील पश्चिम पट्यात मे महिन्यात बिबट्याने धुमाकूळ घालण्याच्या घटना वेळोवेळी घडल्या आहेत़ शेळ्या-मेंढ्यांचा खात्मा देखील झाला आहे़ याला कंटाळून नागरीकांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या़ त्याला पकडण्याचे मोठे आव्हान वन विभागापुढे होते़ मोठ्या अथक परिश्रमाने वन विभागाच्या कर्मचाºयांनी धुमाकूळ घालणाºया बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळविले होते़ त्या बिबट्याला पकडून पिंजºयात अडकवून धुळे तालुक्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लळींग कुरणात सोडून देण्यात आले होते़ मंगळवारी पहाटे बिबट्याला अपघाती मृत्यू झाला आहे़ वनविभागाकडून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे़ 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.