धुळयात लोकप्रतिनिधीविना होणार खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:27 AM2019-04-24T11:27:39+5:302019-04-24T11:28:27+5:30

२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार नियोजन

Kharif seasonal review meeting will be held without any representation in Dhule | धुळयात लोकप्रतिनिधीविना होणार खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

धुळयात लोकप्रतिनिधीविना होणार खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

Next
ठळक मुद्देदरवर्षी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होत असते बैठकआचारसंहितेमुळे बैठकीला केवळ अधिकारीच हजर राहणार

आॅनलाइन लोकमत
धुळे : खरीप हंगामाची रूपरेषा ठरविण्यासाठी दरवर्षी एप्रिल महिन्यातच जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक होत असते. मात्र यावर्षी लोकसभेची निवडणूक असल्याने, ही खरीप हंगामपूर्व आढावा बैठक लोकप्रतिनिधीविनाच २५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा नियोजन सभागृहात होणार असल्याचे सांगण्यात आले.
दरवर्षी साधारणत: एप्रिल महिन्यात खरीप आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होत असते. या बैठकीला खासदार, आमदार हे लोकप्रतिनिधीही उपस्थित असतात. बैठकीत ते देखील आवश्यक सूचना जिल्हा प्रशसनाला करीत असातत.
या एप्रिल महिन्यातच लोकसभा निवडणूक होत आहे. लोकसभा निवडणुकीची आचासंहिता सुरू आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांसह इतर लोकप्रतिनिधीही या बैठकीला हजर राहणार नाहीत. ही बैठक जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, त्यास जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागाचे अधिकारीच हजर राहून नियोजन करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

 

Web Title: Kharif seasonal review meeting will be held without any representation in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.