धुळे महापालिकेचा आस्थापना खर्च कमी करण्यासाठी उत्पन्न वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 07:22 PM2018-02-15T19:22:33+5:302018-02-15T19:23:43+5:30

मंत्रालयात बैठक, ४३४ कर्मचाºयांना कायम करण्याचा होता प्रस्ताव

Increase income to reduce the cost of establishment of Dhule municipal corporation | धुळे महापालिकेचा आस्थापना खर्च कमी करण्यासाठी उत्पन्न वाढवा

धुळे महापालिकेचा आस्थापना खर्च कमी करण्यासाठी उत्पन्न वाढवा

Next
ठळक मुद्दे४३४ कर्मचाºयांना कायम करण्याबाबत मंत्रालयात बैठकआस्थापना खर्च ५७ टक्के असून तो ३५ टक्क्यांवर आणण्याचे आव्हानआकृतीबंध मंजूर असूनही पदभरती रखडलेलीच

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मनपाने रोजंदारी व फंडातील ४३४ कर्मचाºयांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे़ त्याप्रश्नी बुधवारी मंत्रालयात बैठक झाली़ या बैठकीत, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी मनपाला आस्थापना खर्च कमी करण्यासाठी उत्पन्नवाढीवर भर देण्याचे आदेश दिले़
मनपाने जुलै २०१७ या महिन्यात रोजंदारी व फंडातील एकूण ४३४ कर्मचाºयांना कायम करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविला होता़ त्यात रोजंदारी कर्मचाºयांमध्ये १९९३ पूर्वीचे ६२, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रूजू झालेले ७३ व उच्च न्यायालयाच्या आदेशाने रूजू झालेल्या २३ कर्मचाºयांसह अन्य कर्मचाºयांचा समावेश आहे़
महापालिकेचा आस्थापना खर्च सद्यस्थितीत ५७ टक्के असल्यामुळे आकृतीबंध मंजूर असूनही पदभरती रखडली आहे़ अशा परिस्थितीत ४३४ कर्मचाºयांना कायम कसे करणार? असा प्रश्न प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी उपस्थित केला़ मनपाने उत्पन्नवाढीसाठीच्या कार्यवाहीचा तपशिल सादर करावा, उत्पन्न किमान १० कोटींनी वाढविण्याचे प्रयत्न करावे, असेही त्या म्हणाल्या़ बैठकीस आमदार अनिल गोटे, आयुक्त सुधाकर देशमुख, कार्यालय अधीक्षक नारायण सोनार, सुनिल देवरे, भानुदास बगदे उपस्थित होते़ 

Web Title: Increase income to reduce the cost of establishment of Dhule municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.