शिरपूर तालुक्यात  २० हजार गॅस व लाखावर घरकुल वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:41 PM2018-12-16T17:41:59+5:302018-12-16T17:42:31+5:30

अर्थे : गरजूंना गॅस वाटपप्रसंगी खासदार हिना गावीत

 House-house distribution of 20 thousand lacs and a house in Shirpur taluka | शिरपूर तालुक्यात  २० हजार गॅस व लाखावर घरकुल वाटप

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : नंदुरबार लोकसभा अंतर्गत आतापर्यंत १ लाख ४० हजार मोफत गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले आहे. या शिरपूर तालुक्यात २० हजार महिलांना गॅस कनेक्शन वाटप केले. तसेच आता पर्यंत या मतदार संघात १ लाख १० हजार गरजूंना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.  सौभाग्य वीज योजनेसाठी साडेचार कोटी रुपये मंजूर करून प्रत्येकाच्या घरापर्यंत वीज कनेक्शन मोफत दिले जात आहे. तसेच गावाचे व शेताचे वीज फिटर वेगवेगळे करण्यासाठी ४४ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार डॉ.हिना गावित यांनी गॅस वाटपप्रसंगी दिली़ २९ रोजी अर्थे येथील कवी कुसुमाग्रज माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गॅसजोडणी वाटपाचा कार्यक्रम झाला़
यावेळी तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, सुप्रिया गावीत, जिल्हा उपाध्यक्ष मिलींद पाटील, धुळे भाजपाचे चिटणीस संजय आसापुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत पाटील, पंचायत समिती सदस्य दिलीप तडवी, रेमाल पावरा, वकवाडचे रावा पावरा, माजी जि.प.सदस्य रामदास कोळी, प्रफुल्ल पाटील, बाळु पाटील, सरपंच संघटनेचे अध्यक्ष भास्कर बोरसे, शिंगाव्याचे सरपंच मधुकर पाटील, लोंढरेचे सरपंच डॉ.प्रदिप पाटील, जवखेड्याचे सरपंच कैलास पाटील, अंतुर्लीच्या सरपंच मिराबाई कोळी, रोहीणीचे बन्सिलाल बंजारा, उपसरपंच प्रशांत पाटील, डॉ.शशिकांत चौधरी, माजी सरपंच सुनील पाटील, अजंदेच्या सरपंच अन्नपुर्णा पाटील, गणेश माळी आदी उपस्थित होते.
राहुल रंधे म्हणाले, तालुक्यात गॅस जोडणीचे काम जवळ जवळ पुर्ण झाले आहे. पण मध्यंतरी आचारसंहिता असल्याने काम थांबले होते. तालुक्यात विकासकामे चालु असतानाही विरोधक विनाकारण विरोध करत आहेत. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. कॉग्रेसने दुष्काळ व गॅस योजनांसाठी कारण नसताना मोर्चा काढला. तालुक्यात शिरपूर पॅटर्न राबविला असतांना दुष्काळची मागणी करण्यात विरोधाभास आहे.   खासदार हिना गावीत म्हणाल्या, तालुक्यातील रस्त्याच्या कामासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे.  महीलांचे पयार्याने संपुर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी गॅसजोडणी देण्यात येत आहे़ त्यामुळे डोळे, दमा, श्वसन, डोकेदुखी आदी आजार कमी होतील हा उद्देश होता. त्यावेळी या योजनेचा आदर्श गुजरातने घेऊन त्यांनीही ही योजना अंमलात आणली. तेव्हा कॉग्रेस अंतर्गत डॉ.गावितांना विरोध झाला होता. नंदुरबार लोकसभा मतदार संघातील सर्व गरजुंना गॅस उपलब्ध करण्यात येत आहे.  
या कार्यक्रमात गरजुंना २ हजार ९२ पंतप्रधान उज्वला  मोफत गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. त्यात दहिवद १०३, बलकुवे १०२, अंतुर्ली १००, बोराडी ९५, भरवाडे ८६, नटवाडे ८६, थाळनेर ८४, करवंद ८१, उंटावद ७९, नादर्डे ७६, न्यु.बोराडी ६८, बुडकी ६४, टेकवाडे ६०, गरताड ५९, जवखेडा ४६, निमझरी ४२, कळमसरे ४१, कुवे ३९, कोडीद ३९, बोरपानी ३८, वरुळ ३८, तºहाडकसबे ३७, मांडळ ३७, भटाने ३५, शिंगावे ३५, अहिल्यापूर ३४, गुºहाळपानी ३३, वाडी ३२, सावळदे ३२, खर्दे बु.३१, लौकी २७, फत्तेपूर २६, मुखेड २५, अजंदे खु. २४, अर्थे २४, विखरण २४, कुरखळी २३, उमर्दा १९, वासर्डी १८, झेंडेअंजन १६, वकवाड १६, चांदपुरी १५, टेंभे १५, नवे भामपूर १४, वाठोडे १२, सुभाषनगर १२, अमोदा ११, वरझडी ११, जुने भामपूर १०, जैतपूर ९, आढे ५, ताजपुरी ५, खामखेडा टेकवाडे २ असे एकूण  ५४ गावातील महिलांनासाठी गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.

Web Title:  House-house distribution of 20 thousand lacs and a house in Shirpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे