शहरातील अवैध पार्किंग धुळेकरांसाठी ‘डोकेदुखी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:55 AM2019-04-18T11:55:54+5:302019-04-18T11:56:19+5:30

दुर्लक्ष : महापालिका, वाहतूक शाखेकडून निर्णयाची अपेक्षा

'Headache' for illegal parking in city | शहरातील अवैध पार्किंग धुळेकरांसाठी ‘डोकेदुखी’

dhule

Next
ठळक मुद्देदुर्लक्ष : महापालिका, वाहतूक शाखेकडून निर्णयाची अपेक्षा


धुळे : शहरात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर व कडेला अवैधरीत्या वाहने उभी करण्याकडे कल वाढला आहे. मात्र चालक-मालकांच्या या बेशिस्तीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे.
शहरात कुठेही व अत्यंत बेशिस्तपणे वाहने उभी करून ठेवली जातात. बोकाळलेली ही अवैध पार्किंगच आता सर्वसामान्यांच्या जीवावर उठली आहे. मात्र वाहतुकीचे नियमन करणाºया वाहतूक शाखेला याचे सोयरसूतक दिसत नाही. तसेच शहरात मनपाने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मुख्य चौकांमध्ये नेहमीच मोठी वर्दळ असते. तरीही तेथे अशा पद्धतीने वाहने तासन्तास उभी केली जातात. तेथे जवळच उभे राहून वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वाहतुकीचे नियमन करतात. परंतु तरीही त्यांच्याकडून या वाहनधारकांना मज्जाव केला जात नाही. ही वाहने येणाºया-जाणाºयांसाठी मोठा अडथळा ठरत आहे़ महापालिका प्रशासनाकडून कोणताही मार्ग काढला जात नाही़
 प्रवासी वाहतूक करणारी वाहने मोठ्या चौकांमध्ये उभी राहून प्रवासी घेतात. एखादा मोठा अपघात झाल्यानंतर कारवाई केली जाते मात्र ती केवळ नावालाच असते़  अवैध पार्किंगमुळे पादचारी, दुचाकीस्वारांना कसरत करावी लागते. त्यामुळे वाहतूक शाखेने परिणामकारक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 
सिग्नल यंत्रणेचा बोजवारा
शहरातील सिग्नल यंत्रणेचा बोजवारा परिवर्तनाची आस धरून असलेल्या शहरांना सध्या वाहतूक कोंडीच्या समस्येने चांगलेच ग्रासले आहे. बेशिस्त वाहनचालक, वाढलेली गर्दी, दिरंगाईने सुरू असलेली रस्त्याची कामे आणि त्यामुळे अरुंद झालेले रस्ते, यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. अशातच शहरातील मुख्य रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणा केवळ देखाव्यासाठी असल्याचे दिसून आले आहे. 
गेली अनेक वर्षे शहरात सिग्नल यंत्रणाच नसल्याने चौकात वाहतूक कोंडीच्या समस्या उद्भवतात. तर शहरात नव्याने येणारी सिग्नल यंत्रणा अद्याप प्रतीक्षेतच असल्याचे चित्र आहे.

Web Title: 'Headache' for illegal parking in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे