मेडीकल कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये हातसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 07:40 PM2019-06-23T19:40:52+5:302019-06-23T19:41:23+5:30

७८ हजाराचा मुद्देमाल : चोरटा कॅमेरात कैद

Handicap in medical college canteen | मेडीकल कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये हातसफाई

मेडीकल कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये हातसफाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : सुरत-नागपूर बायपास चक्करबर्डी जवळील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील मुलांच्या हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये चोरट्याने प्रवेश करत ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. 
हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी पोलीसांत चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी कॅन्टीनच्या मागील बाजूच्या अंगणातील दरवाजातून हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी मुलांच्या हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील गल्ल्यातील साठ हजार रुपये, मंगळसुत्र आणि अन्य साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. रविवारी सकाळी कॅन्टीनचा दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. कॅन्टीनमध्ये काम करणारे सर्वजण बाजूच्या अंगणात झोपले होते. याचा फायदा घेत चोरट्याने या मुद्देमालावर डल्ला मारला.
चोरीची घटना घडल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मेडिकल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असून चोरट्याचा त्यात वावर सुरु असल्याचे दिसत आहे़ त्यामुळे चोरट्याचा शोध सुरु केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले़ 

Web Title: Handicap in medical college canteen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.