कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपूजन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:53 PM2019-07-17T22:53:53+5:302019-07-17T22:54:08+5:30

गुरुपौर्णिमा : जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय, मंदिरांमध्ये उत्साह

Gurupujan program to express gratitude | कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपूजन कार्यक्रम

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपूजन कार्यक्रम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : सदगुरु सारखा असता पाठीराखा. या भावनेतूनच गुरुपौर्णिमेला गुरु प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरु पुजनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रुहाणी मानव केंद्र
पिंपळनेर- गुरुपौर्णिमेनिमित्त येथील रुहाणी मानव केंद्रात आदीत्य फाऊंडेशन व सुहरी हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग् निदान व उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा हजारो भक्तांनी लाभ घेतला. यात डॉ.जितेश चौरे, डॉ.योगिता चौरे, डॉ.कैलास पगारे, डॉ.संजय बोरसे, डॉ.एस.आर. महाले यांनी विविध आजारांचे निदान करुन मोफत औषधोपचार देण्यात आले. शिबिरास रिखब जैन, जिल्हा रुग्णालयाच्या प्रमिला गोरख पाटील, हिरे मेडिकल कॉलेजचे सुलाभाई नाईक, दुर्गेश सोनवणे, पूनम सोनवणे, सुहरी हॉस्पिटलचा नर्सिंग कर्मचारी सीताराम अहिरे, दत्तू सांगळे, हिरालाल भारुडे, अक्का माळी, सुधा बोरसे, विमल ठाकरे, ज्योति पवार, अक्का गांगुर्डे, प्रविण पवार, वर्षा कोकणी यांनी सेवा देवून सहकार्य केले. 
एम.एच.एस.एस. महाविद्यालय
शिंदखेडा - येथील एम एच एस एस कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रा. दीपक माळी होते. यावेळी प्रा.परेश शहा यांनी विद्यार्थ्यांना मौलिक सल्ला दिला.  यावेळी गुरू-शिष्याचे नाते समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात हे विशद केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. दिपक माळी यांनी आजच्या काळात पुस्तक हा आपला गुरू असून वाचनामुळे माणूस समृद्ध व खºया अर्थाने शिक्षित होतो. पुस्तक वाचनाने व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल घडून येतो व समाजाला सकारात्मक दिशा देण्यासाठी कार्य करण्याचा मार्ग वाचनातून मिळतो. विद्यार्थ्यांनी वाचनात जीवनाला स्थान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक प्रा. जी के परमार यांनी तर सूत्र संचालन प्रा. पी.टी. पाटील यांनी केले. आभार  प्रा. सी.डी. डागा यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले होते.
साई मिरवणूक
सोनगीर -  येथील इंदिरानगर मधील श्री साई श्रद्धा ग्रुपतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. सकाळ पासून साईबाबा मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात सकाळी पाच वाजता साईबाबांच्या मुर्ती व पादुकांचे दुग्धाभिषेक करण्यात आले. सायंकाळी गावातून वाजंत्रीसह भव्य पालखी सोहळा मिरवणूक काढण्यात आली. रात्री समता परिषदेचे जिल्हाकार्याध्यक्ष आर.के. माळी व गोरख दौलत पाटील यांच्या सपत्नीक हस्ते महाआरती करण्यात आली. आरती नंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन  करण्यात आले होते. परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ    घेतला.यावेळी साई श्रद्धा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रविण भोई, अध्यक्ष प्रकाश भोई, सुनील भोई, राहुल भोई, महेंद्र माळी, योगेश माळी, अजय भोई, कुंदन माळी, गोपाल धनगर, कल्पेश माळी, गणेश मिस्तरी, राहुल सुतार, शैलेश वाणी, महेंद्र भोई, किरण माळी, पंकज भोई, विशाल भोई, गोलू भोई, समाधान भोई व श्री साई श्रद्धा गृप, आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये उत्सव
मालपूर- येथील गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा व आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य थॉमस यांनी गुरु महिमेबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. अनेक प्रसंगासह गुरुशिष्याची जोडी व महतीची आठवण करुन दिली. संस्था चेअरमन युवराज सावंत यांनी विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही मनोगते व्यक्त करुन गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त केली. १२ जुलै रोजी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिंडीत मोठ्या उत्साहात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी इंग्लिश स्कूल
साक्री- येथील श्री छत्रपती शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा सन्मान करत गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बी.एम. भामरे होते. या प्रसंगी विद्यार्थिनी व भारती पाटील या शिक्षिकांनी गुरूपौर्णिमेविषयी माहिती दिली. बी.एम. भामरेंनी प्रत्येकाच्या जीवनात आपल्या जडणघडणीसाठी ज्या ज्या गुरुजनांनी आपल्यावर संस्कारांचे घाव घेतलेत त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याचे सांगितले. सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रोहिणी नेरे यांनी मानले.

Web Title: Gurupujan program to express gratitude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे