धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २८ कोटींचा पीक विमा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 05:23 PM2019-07-18T17:23:03+5:302019-07-18T17:25:15+5:30

१६ हजार १७९ शेतकऱ्यांना झाला लाभ

Grant of crop insurance of 28 crores to farmers of Dhule district | धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २८ कोटींचा पीक विमा मंजूर

धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २८ कोटींचा पीक विमा मंजूर

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात २०१६ पासून पीक विमा योजना सुरूगेल्यावर्षी १६ हजार १७९ शेतकºयांना लाभ

आॅनलाइन लोकमत
धुळे : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१८ मध्ये १४ हजार ६१५ शेतकºयांना १८ कोटी ३४ लाख, तर प्रधानमंत्री पीक विमा योजना पुनर्रचित फळपिक विमा मृग बहार अंतर्गत डाळींब पिकासाठी १ हजार ५६४ शेतकºयांना ९ कोटी ८० लाख रुपयांचा फळपिक विमा मंजूर झाला आहे. दोन्ही पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात १६ हजार १७९ शेतकºयांना एकूण २८ कोटी १४ लाख रूपयांचा पीक विमा मंजूर झाल्याचे जिल्हा कृषी विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
धुळे तालुक्यातील आर्वी, बोरकुंड, फागणे, कुसूंबा, मुकटी, नेर, शिरूड शिरपूर तालुक्यात सांगवी या महसूल मंडळात कापूस या पिकाला विमा मंजूर असल्याचे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाने जाहीर केलेली नवीन प्रधानमंत्री पीक विमा व फळपिक विमा योजना खरीप हंगाम २०१६ पासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ही योजना सर्व शेतकºयांना लागू असून, पीक कर्ज घेणाºया शेतकºयांना बंधनकारक आहे. कर्ज न घेणाºया शेतकºयांसाठी ही योजना ऐच्छिक आहे.
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोग, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाºया नुकसानीस वैयक्तिक पातळीवर विमा संरक्षण देण्यात येणार आहे. पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट जसे नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग, पीक पेरणीपूर्वी किंवा लावणीपूर्वी अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसूचित मुख्य पिकांचीव्यापक प्रमाणावर पेरणी, लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी विमा संरक्षण देय आहे.
धुळे जिल्ह्यात खरीप हंगाम २०१८ अंतर्गत मंजुर पिकविमा रक्कम व शेतकरी संख्या खरीप हंगाम सन २०१७ शी तुलना केली असता रक्कम १६.५१ कोटी व ११२५२ शेतकरी संख्येने जास्त आहे. सदर योजनेत शेतकºयांना पिक विम्याचा फायदा होत असल्याने शेतकºयांचा सहभाग वाढत असल्याचे दिसत आहे.
प्रधानमंत्री पिक विमा हंगाम २०१९ अंतर्गत पिक विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत २४ जुलै,२०१९ अशी आहे. ही योजना शेतकºयांसाठी फायदेशीर ठरत आहे.
अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, पंचायत समितीतील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, सहकारी, राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत शेतकºयांनी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
 

Web Title: Grant of crop insurance of 28 crores to farmers of Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.